Take a fresh look at your lifestyle.

भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या ‘या’ दिग्गज कंपनीने केला सर्वात जबरदस्त रेकॉर्ड; वाचा, काय केलेय त्यांनी

दिल्ली :

Advertisement

किया मोटर्स इंडियाने अवघ्या 17 महिन्यांत भारतात 2 लाख वाहनांच्या घाऊक विक्रीचा आकडा पार केला आहे. जुलै 2020 पर्यंत कंपनीने 1 लाख वाहने विकली होती. यानंतर केवळ 6 महिन्यांच्या विक्रमी वेळात किया मोटर्सनी आणखी 1 लाख गाड्या विकल्या. कीया मोटर्सने भारतात सेल्टोस, सॉनेट आणि कार्निवलची विक्री करतात.

Advertisement

किआ मोटर्स ही कंपनी भारतातील कनेक्टेड कार्समध्येही अग्रेसर आहे. किआ मोटर्सने आतापर्यंत 1.06 लाख यूवो कनेक्टेड वाहने विकली आहेत. कंपनीच्या एकूण विक्रीपैकी कनेक्टेड कार्सचा वाटा 53 टक्के आहे. कंपनीने विक्री केलेल्या प्रत्येक दोन मोटारींपैकी एकामध्ये कनेक्टेड कारचे फीचर्स आहेत.

Advertisement

कीया मोटर्स भारतातील पहिल्या 5 कार कंपन्यांपैकी एक आहे. किआ मोटर्सने आतापर्यंत भारतात विकलेल्या 2 लाख युनिटपैकी 149,428 युनिट सेल्टोसचे आहेत. दुसरीकडे, सॉनेटच्या 45,195 युनिट आणि कार्निव्हलच्या 5409 युनिटचे योगदान आहे. सोनट ही किया मोटर्सची नवीन लाँचिंग आहे, जी सप्टेंबर 2020 मध्ये लाँच झाला होता.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply