Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : अखेर लागले गालबोट; प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा आक्रोश..!

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची कोणतीही ठोस दखल न घेणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात आता आंदोलक आक्रमक झालेले आहेत. त्यासाठी दुर्दैवाने त्यांनी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधला आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आंदोलक व पोलीस यांच्यात धुमश्चक्री उडाली आहे.

Advertisement

दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चा अगोदरच परवानगीच्या चक्रात अडकला होता. त्यातून नियम व अटी यासह त्यांना परवानगी मिळाली. मात्र, त्याला आज अखेर हिंसक वळण लागले आहे. दिल्लीच्या मुकरबा चौक येथे पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. आंदोलकांनी बॅरिकेडस तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. तर, आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांडया फोडल्या आहेत.

Advertisement

LoksattaLive on Twitter: “दिल्लीच्या सीमेवर तणाव… राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे. मात्र त्याआधी दिल्लीच्या दिशेने निघालेल्या हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडले आहेत. सविस्तर बातमी > https://t.co/rJHoBRdp20 #FarmersProtests https://t.co/ggnpE45SHj” / Twitter

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन चालू आहे. दोन महिने होत आले तरी त्यावर तोडगा निघालेला नाही. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला. त्यासाठी सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली होती. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होऊ देण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी दिली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या काही गटांनी त्यास न जुमानता दिल्लीत प्रवेश केला. नंतर अशी घडामोड घडली.

Advertisement

मोर्चात फक्त ५ हजार ट्रॅक्टर व तितच्याच संख्येने आंदोलकांच्या सहभागाची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली होती. मात्र, आंदोलकांनी मोर्चात २.५ लाख ट्रॅक्टरसह ५ लाख शेतकरी सहभागी होतील असे म्हटले आहे. सरकारकडून वेळोवेळी अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या. त्यात कोणताही तोडगा निघत नव्हता. मग अखेर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. त्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply