Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अजितदादा संतापले; राज्यपालांवर केली जोरदार टीका

मुंबई :

Advertisement

मुंबईत हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा निघालेला असतानाही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शेतकऱ्यांना भेट घेण्याची वेळ दिली नाही. त्यांचा नियोजित दुसरा कार्यक्रम असल्याने ते आउट ऑफ होते. मात्र, त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

Advertisement

अजितदादांनी म्हटले आहे की, नियोजित कार्यक्रमामुळे राज्यपाल भेटू शकणार नाही असे समजले आहे. मात्र अशावेळी इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कार्यक्रम थोडा बदलायचा होता. कोणाला प्राधान्य द्यायचे हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. एकूणच राज्यपालांना प्राधान्यक्रम लक्षात आला नसल्याचे त्यांनी सूचित केले आहे.

Advertisement

दरम्यान राज्यपाल शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला न भेटल्याने चहूबाजूंनी टीका सुरू झालेली आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत किसान सभा तसंच संयुक्त कामगार-शेतकरी संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणी संदर्भात मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केले. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी एकटवले होते. शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून निवेदन देणार होते. मात्र, राज्यपाल राजभवानात नसल्याने ही भेट होऊ शकली नाही.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply