दिल्ली :
आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशातील ऐतिहासिक आंदोलक शेतकर्यांनी एक मोठी ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. ही रॅली रोखण्यासाठी खूप मोठे प्रयत्न सुरू होते. काही लोकांना दिल्लीत प्रवेश नाकारला होता तर दिल्लीत आणि आसपासच्या परिसरात ट्रॅक्टरला इंधन दिले जात नव्हते. अशातच इतक्या दिवसात शांततेच्या मार्गाने चाललेल्या या आंदोलनाला आता हिंसक वळण लागल्याची बातमी समोर आली आहे.
केंद्र सरकारने हे आंदोलन तसेच ही ट्रॅक्टर रॅली हाणून पडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. थंडीचे दिवस असतानाही शेतकरी सर्व काही सहन करून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. आज ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्याकडे ट्रॅक्टर घेऊन निघालेल्या शेतकर्यांना अडवण्यात आले. आणि तिथे पोलिस आणि शेतकर्यांमधील संघर्ष सुरू झाला. या संघर्षाने काही वेळातच हिंसक रूप धरण केले. सिंधु बॉर्डरवर अडवलेल्या शेतकर्यांवर अश्रुधूराचा वापर करण्यात आला. त्यांच्यावर लाठीचार्जही करण्यात आला.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- म्हणून अदानी-अंबानींच्या संपत्तीत इतकी दमदार वाढ; पहा कोण आहे आघाडीवर..!
- म्हणून औरंगाबादेत निर्माण झाला तणाव; शिवसेनेचे नेते माजी आमदार झाले झटक्यात फरार..!
- MG ने दिल्या 5 रेट्रोफिटेड हेक्टर अॅम्ब्युलन्स; गडकरींच्या हस्ते सेवेला सुरुवात
- म्हणून सोयाबीन खातेय भाव; पहा कुठे कितीवर स्थिरावलेत मार्केट रेट
- हरबऱ्यामध्ये तेजी, मात्र मिळेना हमीभाव; पहा राज्यभरात कुठे, किती मिळतोय बाजारभाव