Take a fresh look at your lifestyle.

म्हणून राहता, शेवगाव व श्रीगोंदेकरांचा झाला हिरमोड; पहा नेमकी कोणती ‘अर्थ’पूर्ण पर्वणी हुकली त्यांची

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा बँकेची निवडणूक म्हणजे अनेकांसाठी पर्वणी. यामधील राजकीय आणि आर्थिक घडामोडी सामान्य माणसांसाठी चर्चेच्या तर गावोगावच्या मुरलेल्या सोसायटी नेत्यांच्या ‘अर्थ’पूर्ण जिव्हाळ्याचा विषय असतात. यंदाच्या निवडणुकीत अशीच पर्वणी लाभण्याची शक्यता सोसायटीबहाद्दरांना होती. मात्र, त्यांना ती मिळणार नसल्याने हिरमोड झाला आहे.

Advertisement

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत राहता आणि शेवगाव येथील सोसायटी मतदारांच्या पर्वणीला अगोदरच ब्रेक लागला आहे. कारण, या दोन्ही जागा बिनविरोध झालेल्या आहेत. राहात्यातून अण्णासाहेब म्हस्के हे राधाकृष्ण विखे पाटील गटाचे संचालक बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर, शेवगाव येथून माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी बिनविरोध जाण्याची किमया साधली आहे.

Advertisement

या दोन तालुक्यातील सोसायटीबहाद्दरांना अर्थपूर्ण संधी नसतानाच श्रीगोंदे तालुक्यातही यंदा सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार राहुल जगताप यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी केली आहे. त्यांच्या विरोधात खमक्या उमेदवार नाही. विद्यमान संचालक दत्तात्रय पानसरे यांनी सोसायटीमधून उमेदवारी अर्ज भरणे टाळले आहे. परिणामी श्रीगोंदेकरांचा झाला हिरमोड झालेला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply