Take a fresh look at your lifestyle.

विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांची निदर्शेने; पहा काय म्हणणे आहे त्यांचे

अहमदनगर :

Advertisement

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठने बीए प्रथम वर्ष आणि एमए द्वितीय वर्ष या  विद्यार्थ्यांसाठी “डेमोक्रसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्स” हा अतिरिक्त अभ्यासक्रम सुरु केला आहे. कोरोनामुळे शैक्षणिक घडी विस्कटलेली असतानाच हा नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांवर लादणे अन्यायकारक आहे. यास चालू शैक्षणिक वर्षासाठी  तात्काळ स्थगित देण्यात यावी अशी मागणी नगर विद्यार्थी कॉंग्रेसच्या एनएसयूआयच्या वतीने करण्यात आली आहे. 

Advertisement

शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे निवेदन विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक प्रा. डॉ. एन. आर. सोमवंशी यांना देण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि.चिरंजीव गाढवे, प्रशांत जाधव, सुजित जगताप, युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, क्रीडा कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रविणभैय्या गीते पाटील, योगेश जयस्वाल, धनंजय महारनोर, महेश कचरे, निखील गलांडे, प्रकाश थोरात, संकेत गवळी, ओम जगताप, ओंकार दरेकर, ऋषिकेश चितळकर महेश सानप, अमित गुंड, आदित्य बेरड, सिद्धांत गिरवले, ज्ञानेश्वर लोखंडे, सुरज बोडके, शिवम करांडे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मागणीसाठी विद्यापीठ उपकेंद्रा बाहेर विद्यार्थी कॉंग्रेसने निदर्शने केली. 

Advertisement

विद्यापीठाने मागणीची दखल न घेतल्यास विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी होत लादलेल्या कोर्सवर आणि त्यांच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply