मुंबई :
ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल इंडिया योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. त्याचवेळी याचा महाराष्ट्र राज्याचा ठेका दिलेल्या कंपनीने आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात सुमारे ३९२ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्याच कंपनीला हे काम देताना किमान वेतन मिळत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेणे आज धरणे आंदोलन सुरू केले आहे.
राज्यातील सर्व ३५१ पंचायत समिती कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येत आहे. ग्रामविकास विभागांतर्गत आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालक कार्यरत असून १० वर्षे प्रामाणिक काम केलेल्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती देण्याची मागणी संघटनेने केली आहे.
संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याच्या मागणीला बगल देऊन आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात सुमारे ३९२ कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या सीएससी, सीपीव्ही याच कंपनीला परत काम देऊन संगणक परिचालकांच्या मानधनात १००० रुपये वाढ करून जखमेवर मीठ चोळण्यात आले असून शासनाने १४ जानेवारीच्या दोन्ही शासन निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन केले जात असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
संपादन : सुनील झगडे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- PM मोदी आणि सीतारामन यांच्या आकडेवाडीत कोट्यावधींची तफावत; वाचा, नेमका कुठे झालाय घोळ
- मोठी बातमी… मोदी सरकार ‘या’ क्षेत्रातील शेकडो कंपन्या विकणार
- मराठा आरक्षण उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या तयारीचा आढावा; वाचा, काय आहे परिस्थिती
- आता 7/12 आणि घरावर लागणार पत्नीचे नाव; महिलांनो, तुमच्या फायद्याची ही योजना घ्या समजून
- अवघ्या ६९ रुपयात मिळवा गॅस सिलिंडर; त्यासाठी करावे लागेल ‘हे’ एकच काम