पणजी :
मासिक पाळी म्हणजे काहीतरी अशुभ किंवा महिला अशुद्ध होण्याचा प्रकार अशीच भारतीयांची धारणा आहे. मात्र, मासिक पाळीमुळे कोणीही अशुद्ध होत नाही असे ठणकावून सांगण्याचे काम पुन्हा एकदा गोवा येथील ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान झाले आहे.
‘ब्रम्हा जाने गोपोन कोम्मोटी’ या बंगाली चित्रपटातील अभिनेत्री ऋतांभरी चक्रवर्ती यांनी चित्रपटामधील त्यांच्या पुजारी महिलेच्या भूमिकेबद्दल बोलताना असे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ईश्वराची कोणतीही निर्मिती केवळ मासिक पाळीमुळे अशुद्ध ठरत नाही याची आठवण आपले चित्रपट करून देतात.
‘इंडियन पॅनोरमा’मधील फीचर फिल्म वर्गामध्ये हा चित्रपट ‘ब्रम्हा जाने गोपोन कोम्मोटी’ हा सिनेमा दाखवण्यात आलेला आहे. महिलांना भेदभावाला सामोरे जावे लागते. पुजारी असलेल्या महिलेची ही कथा आहे. मासिक पाळीला निषिद्ध मानण्याबाबतची समजूत नष्ट करण्याचा लेखिकेचा उद्देश असून या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारायला मिळाली हा आपला सन्मान असल्याची भावना ऋतांभरी चक्रवर्ती यांनी व्यक्त केली आहे.
नायकाची भूमिका साकारणाऱ्या सोहम मुजुमदार यांनी म्हटले आहे की, लग्नानंतर महिलेच्या जीवनातले अनेक बदल स्वीकारण्यासाठी तिला झगडावे लागते. पुजारी म्हणून विधी सुरू ठेवण्यासाठीचे महिलेचे प्रयत्न या चित्रपटात विनोदी ढंगाने मांडण्यात आले आहेत. पुरुषांनी एकत्रितपणे पाऊल उचलले तरच स्त्री-पुरुष समान असलेल्या समाजाची निर्मिती आपण करू शकतो. नाहीतर हेही अशक्य आहे.
संपादन : माधुरी सचिन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- मोदींच्या कायद्याविरोधात व्यापारी आक्रमक; दिली थेट देशव्यापी बंदची हाक
- PM मोदी आणि सीतारामन यांच्या आकडेवाडीत कोट्यावधींची तफावत; वाचा, नेमका कुठे झालाय घोळ
- मोठी बातमी… मोदी सरकार ‘या’ क्षेत्रातील शेकडो कंपन्या विकणार
- मराठा आरक्षण उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या तयारीचा आढावा; वाचा, काय आहे परिस्थिती
- आता 7/12 आणि घरावर लागणार पत्नीचे नाव; महिलांनो, तुमच्या फायद्याची ही योजना घ्या समजून