Take a fresh look at your lifestyle.

कळमकरही म्हणतात ‘गुरुमाऊली’ जिंदाबाद; पहा काय दिल्यात त्यांनी ‘सदिच्छा’

अहमदनगर :

Advertisement

शिक्षक बँक निवडणुकीसाठी सर्वच संघटना आता सक्रिय झालेल्या आहेत. आशावेळी सत्ताधारी गुरुमाऊली मंडळात सध्या इन्कमिंग जोरात आहे. बँकेचे माजी अध्यक्ष आणि सदिच्छा मंडळाचे नेते गोकुळ कळमकर यांनीही ‘गुरुमाऊली’ जिंदाबादचा नारा दिला आहे.

Advertisement

अहमदनगर शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष व सदिच्छा मंडळाचे नेते कळमकर, रमेश धोंगडे यांच्यासह सदिच्छा मंडळातील अनेकांनी आता ‘गुरुमाऊली’ जिंदाबाद म्हणण्यास सुरुवात केली आजे. शिक्षक नेते बापूसाहेब तांबेप्रणीत गुरुमाउलीमध्ये प्रवेश वाढल्याने हा सत्ताधारी शिक्षकांचा ग्रुप आणखी बलवान होत आहे.

Advertisement

कळमकर म्हणाले की, मागील २५ वर्षे ‘सदिच्छा’मध्ये काम करीत आहे. मात्र, आता सदिच्छा मंडळाची सूत्रे ही सर्व संघटना फिरून आलेल्या व्यक्तीच्या हाती गेली आहेत. त्यांच्या मनमानीने सदिच्छा मंडळ संपण्याची शक्यता आहे. गुरुमाउलीच्या विद्यमान संचालक मंडळाचा कारभार चांगला असल्याने तांबे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा गुरुमाउली मंडळच बँकेमध्ये निवडून येईल.

Advertisement

तर, बापूसाहेब तांबे म्हणाले की, बँकेचे संचालक मंडळ अतिशय काटकसरीने कारभार करीत असलेला कारभार राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे. सातारा बँकेच्या निवडणुकीमध्येही नगर बँकेचे उदाहरण दिले गेले आहे. पुढील काळातही गुरुमाउली मंडळ असेच सभासदांच्या व बँकेच्या हितासाठीचे काम करीत राहील.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply