Take a fresh look at your lifestyle.

आगामी दोन पैकी एक तरी वर्ल्डकप न जिंकल्यास विराटने राजीनामा द्यावा; ‘या’ खेळाडूचे मोठे वक्तव्य

दिल्ली :

Advertisement

सध्या भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू आणि टिम इंडियाचा कर्णधार म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या विराट कोहली टिम इंग्लंडच्या एका खेळाडूने मोठे आव्हान दिले आहे. ‘जर विराटने आयसीसीच्या आगामी दोन वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला विजेतेपद मिळून दिले नाही तर त्याने कर्धारपदाचा राजीनामा द्यावा’, असे वक्तव्य इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉटी पनेसरने केले आहे.

Advertisement

या वर्षाच्या अखेरीस टी-२० वर्ल्डकप भारतात  होणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी वनडे वर्ल्डकप देखील भारतात होईल. भारतीय संघाला विजेतेपद मिळून देऊन विराट कोहलीला नेतृत्व सिद्ध करण्याची संधी आहे.  तो म्हणाला की,  भारताने त्याच्या देशात होणाऱ्या टी-२० किंवा वनडे वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले नाही तर मला वाटते की विराटने कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा.

Advertisement

दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अजिंक्य रहाणेनेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मिळवलेल्या यशानंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदावरून चर्चा सुरू झाली आहे. फक्त क्रिकेट चाहते नाही तर माजी खेळाडूंनी देखील अजिंक्यला कसोटीचा कर्णधार करण्याची मागणी केली आहे.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply