Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ कारणामुळे होऊ शकते शिखर धवनवर कारवाई; धवनने केलाय ‘हा’ प्रकार

दिल्ली :

Advertisement

भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेला शिखर धवनला आता एका कारवाईला सामोरे जावे लागू शकते. आता तुम्हाला वाटत असेल की, धवनने क्रिकेट दरम्यान काही घोळ घातला असावा. मात्र तसे नसून शिखर धवनला पशूंच्या संपर्कात आल्यामुळे कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

Advertisement

कोरोनाच्या संकटापाठोपाठ बर्ड फ्लूचे संकट भारतात पसरले आहे. मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची कत्तल झाली आहे. कावळा आणि इतर पशूंचाही बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. अशातच शिखर धवनने काही पक्षांना दाणे खाऊ घालतानाचा फोटो व्हायरल झाले आहेत.

Advertisement

वाराणसीत नावेतून फिरताना पक्षांना दाणे खाऊ घालतानाचा फोटो पोस्ट केल्यामुळे शिखर धवन अडचणीत सापडला आहे. शिखर धवन यानं शनिवारी आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

Advertisement

देशभरात विविध शहरात बर्ड फ्लूचं सावट आहे. बर्ड फ्लूचं संकट असताना पक्ष्यांना हाताळणं किंवा त्यांच्या संपर्कात येणं टाळावं असं प्रशासनाने बजावलं आहे. असं असताना शिखर धवनने पक्ष्यांना दाणे खाऊ घातल्यानं त्याच्यावर कारवाईची शक्यता आहे.  या फोटोची आता चौकशी केली जात आहे. शिवाय त्या नाविकावरसुद्धा कारवाई सुरु केली जाणार आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply