‘त्या’ एका कारणामुळे हरला ऑस्ट्रेलियाचा संघ; वाचा, काय कारण सांगितलेय ‘त्या’ महान खेळाडूने
दिल्ली :
भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) 2-1ने पराभव झाला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीमला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाची बॅटिंग अपयशी ठरली. सगळीकडे ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची चर्चा चालू असताना ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार इयन चॅपल यांनी ऑस्ट्रेलियाचा नेमका पराभव का झाला याचे कारण सांगितले आहे.
ते म्हणाले की, दुखापती या भारतीय संघासाठी वरदान ठरल्या. त्यामुळे प्रत्येक कसोटीत भारतीय संघाला नव्या, ताज्या दमाच्या खेळाडूंचा समावेश करावा लागला. ऑस्ट्रेलियाने बिलुकल या उलट केले. ऑस्ट्रेलिया चारही कसोटी सामन्यात त्याच चार गोलंदाजांना घेऊन खेळली. त्यामुळे मालिकेच्या अखेरीस ते थकले होते. त्यांची दमछाक झाली.
अधिक खोल विश्लेषण करताना त्यांनी गोलंदाजीकडेही लक्ष वेधले. ते म्हणाले की, प्रत्येक कसोटी सामन्यात त्याच चार वेगवान गोलंदाजांना घेऊन खेळणे ही ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी चूक होती. वेगवान गोलंदाजांनी पाच आठवडयात चार कसोटी सामने खेळणे म्हणजे चार मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावण्यासारखे आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ‘ते’ ऑनलाईन शिक्षण जातेय विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून; पहा काय म्हटलेय ‘ब्रेनली’ने
- संघश्रेष्ठींच्या निवाड्याला आव्हान; ‘किटली’च्या विरोधात ‘कुकर’वाल्यांचा ‘प्रेशर’..!
- जळगाव व नागपुरातील ‘त्या’ संस्थांची होणार चौकशी; महाविकास आघाडीचा निर्णय
- फडणवीस-मुनगंटीवारांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ योजनेची होणार चौकशी..!
- ब्रेकिंग ‘आयकर’ने त्यांच्यावर टाकली वक्रदृष्टी; ‘फँटम फिल्म’शी संबंधित सेलिब्रिटीची झाली अडचण