Take a fresh look at your lifestyle.

असे बनवा चिकन क्रिस्पी; रेसिपी वाचा एका क्लिकवर

चिकनचे विविध पदार्थ आपण हॉटेलमध्ये खात असतो. काही पदार्थ आपण हॉटेलमध्ये खाल्ल्यावर आपण घरीही ट्राय करतो. मात्र ते हॉटेलसारखे बनत नाहीत. ‘चिकन क्रिस्पी’ या पदार्थाबाबतही अनेकांचे असे होते म्हणून आज आम्ही तुम्हाला चिकन क्रिस्पीची एकदम परफेक्ट रेसिपी सांगणार आहोत. जी तुम्ही नक्कीच ट्राय करा.   

Advertisement

साहित्य घ्या मंडळीहो…

Advertisement
 1. बोननलेस चिकन
 2. आलं-लसूण पेस्ट
 3. लाल तिखट
 4. लिंबाचा रस
 5. अंड
 6. चिली सॉस
 7. कॉर्नफ्लॉवर
 8. मैदा
 9.  आलं-लसूण बारीक चिरुन
 10. लाल सुक्या मिरच्या
 11. शेजवॉन सॉस
 12. ढोबळी मिरची
 13. मीठ 

हे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला…

Advertisement
 1. बोनलेस चिकन घेऊन त्याचे लांब-लांब तुकडे करुन घ्या. आपल्याला त्याच्या स्ट्रिप्स स्वरुपात कापून घ्या. 
 2. एका भांड्यात चिकन पिसेस घेऊन त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट लावून मॅरिनेट करा. 
 3. मॅरिनेटेड चिकन काढून एका भांड्यात सगळी कोरडी पीठं एकत्र करुन घ्या. एका भांड्यात अंड फोडून घ्या. 
 4. चिकन पिठात अंड्यात आलटून पाटलून घोळवून घ्या. चिकनचे पीस छान तळून घ्या. 
 5. आता फोडणीची तयारी करा. एका भांड्यात तेल घेऊन लसूण-आलं बारीक चिरुन घाला. त्यामध्ये लाल सुकी मिरची, ढोबळी मिरची घालून छान परतून घ्या.
 6. त्यामध्ये शेजवॉन सॉस घाला. चिकनचे तळलेले पीस घालून त्यामध्ये पाण्याचा हबका मारुन थोडे वाफवून घ्या. 

संपादन : संचिता कदम

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply