शाही ऑम्लेट ही दिसायला अगदी रेग्युलर ऑम्लेटसारखे असले तरी याची चव मात्र भन्नाट आहे. हे बनवायला वेळही कमी लागतो आणि टेस्टही भारी लागते. त्यामुळे हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो.
साहित्य घ्या मंडळीहो…
- ४ अंडी
- ३ कांदे
- २ टोमटो
- हळद
- तीखट
- गरम मसाला
- मीठ
- कोथिंबीर
- फोडणीसाठी तेल २ चमचे मोठे
- लींबु
हे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला…
- पसरट पॅन मध्ये तेल टाका मग कांदा आणी टोमॅटो बारीक चीरुन टाकणे, मीठ, हळद , तीखट ,गरम मसाला (अंदाजाप्रमाणे) टाकुन २ मीनीट झाकुन अर्धवट शीजुन घेणे.
- एका बाजुला एका भाड्यात अलगद ४ अंडी फोडुन ठेवावी व आतले पीवळे बलक गोल राहील आणी मीक्स नाही होणार याची काळजी घ्यावी.
- झाकण काढून सगळा मसाला गोलाकार आकारात पसरुन घेणे मग चमच्याने चार बाजुला चार मोकळी जागा करुन कींवा होल करुन पीवळे चारही बलक त्यात सोडावे (जेवढी अंडी असतील तेवढ्या जागा) आणि राहीलेला सगळा पांढरा बलक वरुन मसाल्यावर पसरुन टाकणे आणी वर कोथिंबीर बारीक चीरुन टाकावी , पॅन वर २ मीनट झाकण ठेवावे.
- पीवळा बलक शीजला की गॅस बंद. ईथे एक काळजी घ्यावयाची ती म्हणजे पॅन म्ध्ये एकदा पसरुन टाकलेला मसाला ऊलथावयाचा नाही.
- वाढताना चमच्याने पॅन मध्येच चार भाग करुन वाढावे. सोबत लींबु देणे.
संपादन : संचिता कदम
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- विधानपरिषदेच्या कामकाजाला ‘अशी’ झाली सुरुवात; वाचून नक्कीच वाटेल अभिमान
- प्रविण दरेकरांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे ‘ही’ आग्रही मागणी; वाचा, नेमकं काय म्हणालेत ते
- बाजारभाव अपडेट : टोमॅटोच्या भावातही हलकीशी घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6000 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव