Take a fresh look at your lifestyle.

दागिने खरेदी करतान घ्या ‘ही’ काळजी; पहा नेमकी कुठे होऊ शकते फसवणूक

सणासुदीच्या काळात कपडे, इलेक्ट्रोनिक वस्तू, उंची वस्तू आणि दागदागिने यांच्या खरेदीला आताही ऊत आलेला आहे. करोना नावाच्या विषाणूच्या सोबतीने जगताना आता बाजारपेठेने खऱ्या अर्थाने कात टाकली आहे. अशावेळी सगळ्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदीची तयारीही केली आहे. अशाच सर्व मंडळींनी दागिने खरेदी करताना काय काळजी घ्यावी याची माहिती देणारा हा लेखप्रपंच.

Advertisement

वाचा मित्र-मैत्रिणींनो, चांदी आणि सोन्याचेही भाव नेहमी बदलत असतात. जागतिक मार्केटमधील चढउतार आणि स्थानिक गोळाबेरीज लक्षात घेऊन प्रत्येक शहरात याचे भाव वेगवेगळे असतात. त्यामुके सोने किंवा चांदीच्या दागिन्यांची खरेदी करण्याचा विचार करत असतानाच त्यांचा आजचा भाव काय आहे हे एकदा अवश्य पाहून घ्यावे. आता ऑनलाईन वृत्तपत्र किंवा बिझनेस न्यूज चॅनेलवर याची अपडेटेड माहिती सहजपणे मिळते. तसेच याच्या भविष्यातील बाजारभावाचे आडाखेही काही पोर्टलवर व्यक्त केले जातात.

Advertisement

अनेकदा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सोन्याची खरेदी करावीशी वाटते. सध्या सगळे काही ऑनलाईन घेण्याच्या सवयीचे गुलाम म्हणून असे होणेही साहजिक आहे. अशा पद्धतीने ऑनलाईन सोने खरेदीचे दोन प्रकार आहेत. एक अर्थातच गुंतवणूक. म्हणजे ई-गोल्ड घेण्याची सोय. तर, दुसरी पद्धत म्हणजे थेट ऑनलाईन वेबसाईट्सवरून दागदागिने खरेदी करणे होय. पहिल्या प्रकारची खरेदी ही सेफ आहे. मात्र, यातील दुसऱ्या प्रकारात म्हणजे थेट ऑनलाईन दागिने मागवून घेण्यात काही समस्या येऊ शकतात. खूप लोकप्रिय आणि विश्वासार्ह कंपन्यांच्या पोर्टलवरचा असे थेट दागिने खरेदी करा. तसेच खरेदी केलेले वजन, त्याची शुद्धता आणि इतर सर्व डिटेल्सची नोंद काळजीपूर्वक पहा. डीलीव्हरीच्या वेळीही आपण ऑर्डरमध्ये दिलेल्या गोष्टीनुसार दागिने आल्याची खात्री करून घ्या. त्या दागिन्यांसोबत हॉलमार्क आणि मेकिंग सर्टिफिकेट याचीही खात्री करून घ्या.

Advertisement

आपल्याकडे सोन्याचे दागिने सामान्यतः तीन प्रकारचे असतात. 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट यामध्ये सोन्याचे दागिने बनवले जातात. त्याची शुद्धता त्याच तीन कॅरेटमध्ये मोजली जाते. त्यामुळे अशा पद्धतीने दागिने खरेदी करताना चागंल्या सराफी पेढीकडून, ओळखीच्या दुकानातून किंवा ब्रांड असलेल्या ठिकाणाहून सोन्याचे दागिने खरेदी करावेत. बऱ्याचदा शहरी किंवा ग्रामीण भागात एखादा सोनार दागिने 24 कॅरेट म्हणजेच शुद्ध असल्याचे सांगतात. मात्र 24 कॅरेट हे शुद्ध सोने आहे. अशा सोन्यापासून दागिने अजिबातच बनवता येत नाहीत. कारण शुद्ध सोन्यात अशा पद्धतीने बनवलेले दागिने अगदीच सहजपणे व लवकर तुटू शकतात. त्यांचे तुकडे पडून काय उपयोग होणार अशा दागिन्यांचा?

Advertisement

तर, वाचक मित्र-मैत्रिणींनो, सोने हा धातू फारच मऊ असतो. यासाठीच दागिने बनवताना त्याला घडवताना सोन्यामध्ये काही प्रमाणात इतर धातूही मिसळावे लागतात. त्यानुसार त्या सोन्यामध्ये इतर धातू किती प्रमाणात मिसळले आहेत यावरून त्याची शुद्धता कमी होते. अगदीच प्रत्येक सोनाराकडे सोन्याची शुद्धता तपासण्यासाठीचे मशिन असतेच. त्यावर आपण घेत असलेल्या दागिन्यांची शुद्धता तपासून घ्यावी. अशा पद्धतीने सोने आपल्याला जे विकण्यात आलेले आहे ते सांगितले आहे त्याच कसोटीवर उतरणारे आहे किंवा नाही हे पहुचन घेत जा. 

Advertisement

हॉलमार्क ही सोन्याची शुद्धता आणि गुणवत्ता प्रमाणित करणारे असते. त्यामुळे आपण खरेदी केलेल्या दागिन्यांवर हॉलमार्कचे आहेत की नाहीत हेही नीट तपासून पाहा. हे काळजीपूर्वक पाहून घेणे हे ग्राहक म्हणून आपलेच कर्तव्य आहे. दागिन्यांच्या हॉलमार्क नंबरवरून सोन्याची गुणवत्ता तपासून पाहता येते. मात्र, तरीही काहीजण सराफ त्याच्याही पुढचे असतात. ग्राहकांना फसवण्यासाठी ते हॉलमार्क दागिन्यांमध्येदखील फसवणूक करतात. सोनार स्वतःच त्या दागिन्यावर हॉलमार्क बनवतात. खरेदी केलेल्या दागिन्यांवर भारतीय मानक ब्युरो यांचे त्रिकोणी चिन्ह आणि सोन्याची शुद्धता हेदेखील लिहीलेले असते. दागिना कोणत्या वर्षी बनवला, उत्पादकाचा लोगो अशी बेसिक माहिती त्यावर असते. त्यावरूनही खरेदी केलेल्या सोन्याची शुद्धता तपासू शकता.

Advertisement

सोन्याचे नाणे, वळी अथवा पट्टी अशा स्वरूपात किंवा थेट सोन्याचे तयार दागिने याद्वारे आपण सोन्याची खरेदी करतो. अशावेळी सोनाराचे मेकिंग चार्जेस अर्थात घडणावळ किती आहेत हेही जरूर जाणून घ्या. कारण त्यामुळे खरेदीचे बजेट खाली-वर होते. अनेकदा घडणावळ आणि जीएसटीचा खर्च वाचवण्यासाठी आपण छोट्या आणि कोपऱ्यावरील पेढीच्या सोनाराकडून दागिने खरेदी करतो. अशातच अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. वजन, कॅरेट, आजचा दर, मेकिंग चार्जेस, शुद्धता आणि जीएसटीची नोंद केलेली असेल अशा पक्क्या पावतीसह दागिने किंवा सोन्याची खरेदी करून आपण ही फसवणूक टाळू शकतो. 

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply