Take a fresh look at your lifestyle.

कपडे खरेदी करताना ‘ही’ घ्यावी काळजी; वाचा शॉपिंगबाबत महत्वाची माहिती

या सणासुदीच्या काळातील सर्वात महत्वाचे आणि आवडते काम म्हणजे कपड्यांची खरेदी. होय, पैसे असलेल्यांना तर यानिमित्ताने खरेदीचा आणखी ऊत येतो. करोनाच्या जागतिक संकटातही यंदा या सणानिमित्त बाजारपेठ पुन्हा एकदा कात टाकून नव्या जोमाने नटली आहे. अशावेळी आपण पाहूयात की कपड्यांची खरेदी करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी.

Advertisement

होय, कारण आता आपल्याला थेट दुकानात जाऊन अर्थात ऑफलाईन खरेदी करण्यासह आता ऑफरमध्ये ऑनलाईन खरेदी करण्याचीही संधी आहे. अशावेळी आपण वेळ आणि पैसा अनावश्यक खर्च होणार नाही हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी कपड्यांची खरेदी करायला हवी. त्यातही ऑनलाईन खरेदी करताना फ़क़्त ऑफर देणाऱ्या वेबसाईटवर फोकस न करता दर्जेदार वस्तूंची विक्री करणाऱ्यांना प्राधान्य द्यावे.

Advertisement

कपडे खरेदी करताना अनेकांना ब्रॅण्ड महत्वाचा वाटतो. पण ब्रॅण्ड कितीही मोठा असो किंवा नसो ब्रॅण्डेड कपडे खरेदी करतानाही फिटिंग हा मुद्दा प्राधान्याचा आहे. फिटिंगला जर व्यवस्थित येतो याचा अनुभव असेल तरच अशा कंपनीचे कपडे घ्यावेत. तसेच उत्तम धागे असलेले आणि आपल्याला सूट होणारे कलर निवडून कपडे खरेदी करावेत.

Advertisement

कारण नुसते चकचकीत कपडे दिसतात म्हणून आपण खरेदी केली आणि त्यामुळे मग पस्तावण्याची वेळ आली तर उगीचच भुर्दंड पडतो. तर असे कपडे अनेकदा तुमच्याच व्यक्तिरेखेला बेढब किंवा वाईट करू शकतात. अनेकदा आपल्याला वाटते की नवीन काहीतरी ट्राय करूयात. त्यासाठी कोणता ट्रेंड चालू आहे याचा धागा पकडून आपण कपडे खरेदी करतो. मात्र, वेस्टर्न कपडे खरेदी करताना यापूर्वी पहिले कधीही घातलेच नसतील तर अगोदर खरेदी करण्यापूर्वीच ट्राय करा. घालून पाहिल्यावर तुम्हाला सूट करतात असे वाटले तरच नव्याच्या नादी लागा.

Advertisement

माझ्या मित्राला तो रंग, ब्रांड आणि ती फिटिंग बेस्ट दिसतीय. मग त्या स्टाईलचे कपडे मलाही बेस्ट वाटतील असेच अनेकदा आपल्याला वाटते. मात्र, दुसर्‍यांनी घातलेले कपडे त्यांना चांगले दिसल्यास तुम्हालाही असे कपडे चांगले दिसतील याची काहीही शास्वती नाही. त्यासाठी असे कपडे खरेदी करताना आपल्या शरीराची ठेवण, वजन आणि उंची लक्षात घेऊन व्यक्तिरेखेला साजेसे दिसतील असेच कपडे घ्या. त्यातही फ़क़्त इस्ट दिसतातहा मुद्दा कितीही महत्वाचा वाटत असला तरीही ज्यामध्ये कम्फर्ट वाटेल, अशाच कपड्यांची योग्य निवड आणि खरेदी करावी.

जिन्स पँट किंवा शर्ट यांची चांगली क्रेझ अजूनही कायम आहे. त्यासाठी असे कपडे घेताना स्ट्रेचेबल आणि आपल्याला कम्फर्ट वाटणाऱ्या पद्धतीची जीन पँट खरेदी करावी. त्यावर त्याच धाग्याचा किंवा इतरही प्रकारचा साजेसा वाटणारा शर्ट घ्यावा. कमरेचा घेर फ़क़्त मोजून घेऊन जमतेच असेही नाही. त्यामुळे अशी पँट ट्राय करावी आणि मगच घ्यावी.

तसेच कपडे खरेदी करताना त्याचा भाव जास्त म्हणजे तेच बेस्ट असे काहीही नाही. कपड्यांमध्ये खूप व्हरायटी आणि बेस्ट मार्जिन असल्याने छोट्या दुकानातही आपल्याला उत्तम कपडे सहजपणे मिळू शकतात. टी-शर्ट किंवा ड्रेस यांच्या किमतीसाठी ऑनलाईन पोर्टल पाहून घ्यावेत. तसेच आपण नेहमी खरेदी करतो त्याच ब्रांडचे आणि शक्यतो त्याच पोर्टल किंवा दुकानात जर चांगला अनुभव असेल तर खरेदी करावी. इतर ठिकाणी कपडे व इतर वस्तू कमी किमतीत मिळतात की त्यापेक्षा कमी दरात दुसर्‍या दुकानात किंवा वेबसाईटवर भेटतात याचीही पाहणी करून घेत जाणे.

अनेकांना आपल्या प्रतिमेत अडकायला खूप आवडते. ते काही गैर आहे असेही नाही. मात्र, जीवनातील स्वातंत्र्य उपभोगण्याची महत्वाची खून आपले कपडे हेही आहेत. त्यामुळे शक्यतो एकाच पॅटर्नचे ड्रेस घेऊ नका. नेहमीच वेगवेगळ्य़ा स्टाईलचे, रंगाचे आणि सुटेबल असणारे कपडे घालायला शिका. परिणामी त्यातून दररोजच्या जीवनातूनही सकारात्मक असा वेगळा अनुभव मिळेल असे अनेकांचे म्हणणे आहे.

Advertisement

अशा पद्धतीने कपड्यांची खरेदी करताना नव्या गोष्टी खूप काळजीने ट्राय करा तसेच एकाच चौकटीत राहून कपडे आणि फॅशन यांच्याकडे पाहू नका. शक्यतो एकट्याला कपडे घेण्यापेक्षा उपलब्ध पैशातून आपल्या कुटुंबातील सर्वांना नवीन कपडे घ्या आणि त्यातून संवाद व एकमेकांविषयीचे प्रेमही वाढवा.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply