Take a fresh look at your lifestyle.

त्यासाठी वाचा चिकू फळाची ‘ही’ माहिती; कारण हे फ्रुट रसदार आणि कसदारही आहे

चिकू म्हटले की महाराष्ट्रात आपल्याला डहाणू पट्टा आठवतो. त्या पट्ट्यात चिकूची होणारी लागवड आणि तेथील मोठा टपोरा रसदार चिकू अनेकांना आपलासा वाटतो. या फळाची महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड होते. बारमाही फळ मिळत असल्याने अनेकांना या फळाने मोठा आर्थिक आधार दिला आहे.  मात्र, तरीही चिकू फळाचे आयुष्यच फार कमी असल्याने त्याच्या पक्वतेची लक्षणे ओळखून शास्त्रोक्त काढणी करण्यासह प्रतवारी करून पॅकिंग करणे आणि गरज पडली तर प्रक्रिया करणे हा घटकही खूप महत्वाचा आहे.

Advertisement

चिकू फळांची पक्वतेची लक्षणे लांबून पाहून ओळखणे तसे खूप अवघड जाते. कारण या झाडावर फुले अनियमित आणि सातत्याने येत असतात. परिणामी एकाच वेळी सगळी फळे पिकलेल्या किंवा पिकायला लागलेल्या अवस्थेत पहावयास अजिबात मिळत नाहीत. पक्व झाल्यानंतर अशा फळांची काढणी खूप उशिरा केल्यास फळे फ़क़्त दोन-तीन दिवसातच मऊ पडतात. मग बाजारपेठेत कधी नेणार आणि खराब फळांचे काय करायचे हेही महत्वाचे मुद्दे असतात. त्यामुळे या फळांची योग्य वेळेत काढणी फार महत्वाची आहे.

Advertisement

चिकू या फळाच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. तसेच 5.3-7.4 मिलिग्रॅम तंतुमय पदार्थ यासह क जीवनसत्त्व असते. त्या क जीवनसत्वाचे म्हतव आपण सगळेजण जाणून आहोत. कारण, करोना काळात सध्या आपण इम्युनिटी पॉवर या विषयावर चर्चा करीत असतो. हा चिकू आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवायालाही मदत करतो. एकूण वर्षभराचा विचार केल्यास नोव्हेंबर महिन्यापासून बाजारात जास्त प्रमाणात फळांची आवक होते. अशावेळी जर आपणास प्रक्रिया करायची असल्यास बाजारपेठेच्या मागणीनुसार आणि उपलब्धतेनुसार चिकूपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करावेत.

Advertisement

फळाच्या काढणीनंतर आकारानुसार त्याची प्रतवारी करतात. त्यात मोठे, मध्यम आणि लहान अशा किमान समान वर्गात फळांची प्रतवारी करावी लागते. नंतर ही फळे खराब होणार नाहीत या बेताने कॅरेट किंवा पोत्यामध्ये पॅक करुन विक्रीसाठी पाठवावी लागतात. त्यासाठी पॅक करताना आच्छादन म्हणून वाळलेल्या गावातच वापर केले जाते.

Advertisement

पक्व आणि न पिकलेले फळ 3-5 अंश सेल्सिअस या तापमानाला सुमारे 90 टक्के आर्द्रतेला किमान आठ आठवड्यांपर्यंत टिकतात. तर, पिकलेली फळे 0-2 अंश सेल्सिअस तापमानाला 2 आठवाड्यापर्यंत टिकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे.  

Advertisement

ही फळे पिकविण्यासाठी उबदार ठिकाणी ठेवावी लागतात. अशी फळे इथ्रेलच्या 5000 पीपीएमच्या द्रावणात बुडवून ठेवल्यावर फ़क़्त 2 दिवसातच पिकतात. तर या फाळांना 3-9 % अशा पद्फातीने मेणाच्या द्रावणामध्ये बुडवून काढून ठेऊन आयुष्य वाढवता येते. परदेशात आणि आता भारतातही काही ठिकाणी चिकूच्या फळावर गॅमा किरणांची प्रक्रिया करून अशी फळे दीर्घकाळ टिकवली जातात.

Advertisement

पौष्टीक, स्वादिष्ट व सुमधुर असे हे फळ असूनही खूप अल्पायुषी आहे. त्यामुळे शेतातून काढल्यावर बाजारात या फळांचा वेळेवर खप न झाल्यास मोठे नुकसानही होते. अशावेळी ही नासडी रोखण्यासह फळाचा आस्वाद वर्षभर घेण्यासाठी म्हणून प्रक्रिया करावी लागते. त्यापासून चिकूचा रस, लोणचे, मुरंबा, सरबत, सिरप, चटणी, जॅम, बर्फी, चिकू पावडर आदि पदार्थ तयार होतात.

Advertisement

रस काढण्याची प्रक्रिया करण्यासाठी प्रथम परिपक्व फळांची निवड करावी. नंतर अशी फळे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावीत. नंतर स्टीलच्या सुरीने त्याचे योग्य काप घ्यावेत. अशावेळी अनावश्यक भाग (देठ, कीड लागलेला भाग) काढून टाकण्यासह बिया वेगळ्या करून जुसरमध्ये लगदा करून घ्यावा. त्या लागद्याला पेक्टीनोज एन्झाइमची (0.2 % पेक्टीनोज, कालावधी 2 तास) प्रक्रिया करून सेंट्रीफ्युज करून घ्यावे. मग तयार झालेला रस बॉटलमध्ये पॅक करून ठेवावा.

Advertisement

रस काढून राहिलेल्या लगद्यापासून चिकूची चवदार बर्फी बनवता येते. त्यासाठीसाठी एक किलो गरामध्ये एक किलो साखर, मक्याचे पीठ 50 ग्राम व वितळून घेतलेले वनस्पती तूप 200 ग्राम मिसळून घयवे. हे मिश्रण मस्तपैकी शिजवावे. मिश्रणाचा ब्रिक्स 700 आल्यावर (त्यासाठी ब्रिक्स तपासणी करावी) त्यात मीठ 2 ग्राम आणि 2 ग्राम सायट्रिक आम्ल टाकावे. त्यामुळे याची खराब होण्याची प्रक्रिया रोखली जाते. मग नंतर शिजवण्याची क्रिया ही किय्रा सुमारे 825 ब्रिक्स येईपर्यंत करावी. शिजवलेले हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये / परातीत 1 सेंटीमीटर थर येईपर्यंत एकसारखे पसरावे. असे मिश्रण मस्तपैकी थंड झाल्यानंतर सुरीने योग्य आकारमानाचे कापून बर्फी तयार होते. असे काप ड्रायरमध्ये किंवा पंख्याखाली सुकवून प्लास्टिक पिशवीत पॅक करून साठवावी.

Advertisement

चिकूच्या गरापासून जॅमही तयार करता येतो. एक किलो चिकूचा गर, तितकीच साखर आणिफ़क़्त 2 ग्राम सायट्रिक आम्ल हेच त्यासाठी लागते. हे सर्व घटक पदार्थ मिसळून घट्टपणा येईपर्यंत शिजवून घ्यावेत. त्यासाठी मंद आचेवर नंतर शिजवावे. शिजवताना मिश्रण पळीने हळूहळू हलवावे. शिजलेले घट्ट मिश्रण गरम असतानाच निर्जतूक केलेल्या बाटल्यांत भरून त्या बाटल्या थंड जागी ठेवाव्यात.

Advertisement

चिकू फळाचा मुरंबा आपण ऐकला असेल. त्यासाठी मध्यम पिकलेल्या फळांचा वापर करावा. फळांची स्टीलच्या चाकूने साल काढून नंतर फोडी कराव्यात. एक किलो फोडीमध्ये तितकीच साखर, 10 ग्राम मीठ, 2 ग्राम सायट्रिक आम्ल आणि 25 मिली व्हिनेगार इतकेच घटक यासाठी लागतात. हे सर्व मिश्रण सुमारे 690 ब्रिक्स येईपर्यंत शिजवावे लागते. त्यानंतर तयार झालेला मुरंबा गरमागरम असतानाच निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरून हवाबंद करून त्या बाटल्या कोरड्या व थंड जागी साठवाव्या लागतात.

Advertisement

यासह पक्व चिकूच्या फळाच्या फोडी वळवून घेऊन त्या कडक वाळलेल्या फोडी मिक्सरमधे किंवा ग्राईंडरमधे दळून त्याची पावडर तयार करावी. १० मिमी छीद्राच्या स्टीलच्या चाळणीतून चाळून घेऊन ही भुकटी प्लास्टिक पिशवीमध्ये हवाबंद करून ठेवावी. या पावडरपासून चिकू मिल्कशेक नावाचे स्वादिष्ट पेय आपण वर्षभर घरच्याघरी करून पिऊ शकतो. तसेच वरील सर्व पदार्थ विक्रीही करू शकतो.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply