Take a fresh look at your lifestyle.

‘ऑफर’ पाहून खरेदी करणाऱ्यांनी वाचा ‘ही’ माहिती; नाहीतर पडू शकतो मोठा भुर्दंड

दसरा-दिवाळी असो की कोणताही छोटा-मोठा उत्सवी सीजन असोत, सगळीकडे दोन शब्द बाजारात दिसतात. ते शब्द म्हणजे ‘सेल’ आणि ‘ऑफर’. होय, या दोन शब्दांची भुरळ कोणालाही असते. भले महिन्याला आपण लाख रुपये कमवीत असा. १० रुपयांची ऑफरही आपले नक्कीच लक्ष वेधून घेते. कारण, त्या शब्दातून कमी किमतीत खरेदी किंवा पैसे वाचविण्याची आपली नैसर्गिक प्रेरणा अपोआप उद्यापित होते. आताही सगळीकडे ‘ऑफरवाला’ मंडळी सक्रीय असतील आणि ‘खरेदीवाला’ मंडळीही त्यांना मस्त स्वरसाथ देत असतील. त्या सर्वांनी ही माहिती नक्कीच वाचा.

Advertisement

ऑफर किंवा सेल असा शब्द म्हणजे खूप कमी किमतीत आपल्याला काहीतरी घबाड मिळणार अशीच समजूत करून आपण खरेदी करतो आणि त्या चक्रव्युहात फसतो. सगळ्याच वेळी आपली फसवणूक होते असेच काही नाही. अनेकदा आपल्याला त्या ऑफरद्वारे मस्त वस्तू खूप कमी आणि मुख्य म्हणजे माफक वाटणाऱ्या किमतीत भेटतेही. मात्र, फट डोळे झाकून ऑफरवर विश्वास ठेऊन खरेदी करू नका इतकेच. अनेकदा तर आपण ऑफर पाहून गरज नसलेल्या वस्तूही खरेदी करतो. हे मात्र टाळावे.

Advertisement

वाचक मित्र-मैत्रिणींनो, दसरा-दिवाळी असा सणासुदीचा काळ आणि मनाजोगती आणि खिशाला परवडणारी खरेदी हे समीकरण काही आपल्या भारतात संपलेले नाही. परदेशात जसे नाताळ आणि ईद सणाला मोठी खरेदी होते. तसेच आपल्याकडे दिवाळीच्या काळात. परिणामी आता करोनाच्या संकटाशी लढतानाही देशभरातील शॉपिंग मॉल्स, दुकाने, शॉपिंग स्ट्रीट्स आणि ऑनलाइन खरेदीचे पोर्टल यांनीदेखील याची पर्वणी साधण्याची तयारी केली आहे. अशावेळी सध्या ट्रेण्डमध्ये काय आहे याचा वेध घेऊन खरेदी केली जाणार आहे. आपण आपल्या मित्र-मैतरणी आणि नातेवाईक यांच्याशी चर्चा करून कुठल्या अ‍ॅक्सेसरीज घ्याव्यात, घाल्याव्यात आणि भेट द्याव्यात वगैरे टिप्सही घेत असू. गर्दीत नेमकी आपल्याला हवी ती गोष्ट कशी निवडायची? कुठून घ्यायची? स्मार्ट चॉइस कसा असावा, कुठली वस्तू कुठून घ्यावी, याच्याही चर्चा झडत असतील. त्यातच इथे सेल चालू झालाय, तिकडे ही ऑफर आहे, फालाण्याने ती भन्नाट ऑफर आणलीय अशी चर्चाही झालेली असेल की..

Advertisement

होय, कारण भारत असो की जगभरातील कोणत्याही जाती-धर्माचा आणि प्रदेशाचा माणूस असो. त्यांना ऑफरमध्ये खरेदी करायला खूप आवडते. त्यातही दिवाळीत आपण बरीचशी खरेदी करतो त्यावेळी अनेकदा ऑफरमध्ये जास्त पैसे खर्च करून बसतो. कपडे आणि दागिन्यांची खरेदी करताना ऑफर पाहून आपल्याला मोह होऊ शकतो. अशावेळी आपल्याला गरजेची असणारी आणि ऑफरमध्ये असूनही उत्तम दर्जा असलेल्या वस्तू आणि सामान यांचीच खरेदी करा. असे लक्ष नाही दिले तर मग घरी जाऊन पस्तावण्याची वेळही येऊ शकते.

Advertisement

आता वर्षभर आपण कपडे खरेदी करीत असतोच की. जुन्या काळात दिवाळीचे जास्त अप्रूप होते आणि पैसेही कमी असल्याने एकाचवेळी खरेदी केली जायची. मात्र, आता दिवाळीतही आपल्याला पाहिजे त्याच वस्तू खरेदी करा. सर्वच वस्तू आता ऑनलाईन आणि स्वस्तही मिळत असल्याने आपण कधीही आणि केव्हाही खरेदी करू शकतो. त्यामुळे खरेदी करताना आपण आपल्याकडे यापूर्वी काय प्रकारचे कपडे आहेत आणि कोणत्या प्रकारचे आता आपल्याला घ्यायचे आहेत हे मनोमन पक्के करूनच खरेदी करा. आता बऱ्याच दुकानांत ५०% सूट वगैरे बोर्ड लागलेले असतील. अशावेळी त्या मोहाला अजिबात बळी पडू नका.

Advertisement

आपल्याला पाहिजे त्याचीच आणि दर्जेदार मालाची खरेदी करा. मोबाइल, कपडे, दागिने, फॅन्सी समान, खाद्यपदार्थ आदीच्या भेटवस्तू देताना एकाचवेळी खरेदी करा. कारण, त्यामुळे काही सूट मिळू शकते. आपल्याला सूट मिळण्यासाठी दुकानदाराशी चर्चा करा. अनेकदा त्यातून जास्तीची सूटही मिळू शकते. त्यामुळे आपल्याला लागणाऱ्या, गरजेच्या आणि उपयोगाच्या वस्तूंची ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा कोणत्याही पद्धतीने खरेदी करा. परंतु, अनावश्यक खरेदी मात्र नक्कीच टाळा..

Advertisement

सर्वांना ऑफरचा लाभ घेण्यासाठी आणि मनमुराद खरेदीसाठी शुभेच्छा..!

Advertisement

संपादन व लेखन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply