Take a fresh look at your lifestyle.

म्हणून चौरंगी आहार आहे गरजेचा; वाचा आरोग्यदायी अशी महत्वाची बातमी

चौरंग माहिती आहे ना? होय, तोच चौरंग ज्याचा बसण्यासाठी वापर होतो. लग्न झाले की आपल्याही घरात चौरंग येतोच ना? बसायला मस्त असणारा हाच चौरंग आणि पाट आपण जेवायला घेतो की. तोच शब्द यात आलाय म्हटल्यावर काहींना वाटेल की चौरंगावर ताट ठेऊन जेबन म्हणजे चौरंगी आहार. होय, तसे वाटूही शकते. कारण, टेबल-खुर्चीवर बसून जेऊ नये असेही म्हटले जातेच की. पण या चौरंगी आणि टेबल-खुर्ची किंवा चौरंग यांचा काहीही संबंध नाही.

Advertisement

चौरंगी आहार म्हणजे ज्यात पोषक घटकांचे चार रंग आहेत असा आहार. आहारशास्त्र आपल्याला सर्वांना पूर्णपणे माहिती असतेच असे नाही. त्यामुळे जेवणातील पोषक घटकांबद्दल आपापल्या कल्पना वेगवेगळ्या असतात. मात्र, चौरंगी म्हणजे चार रंग ज्यामध्ये दिसतात असाच आहार होय. जसे की यात पांढरा, पिवळा हिरवा, लाल असे जेवणात रंग असावेत. हे चार रंग असणे म्हणजेच आहार चौरस अर्थात चौरंगी होतो. सगळ्यात पहिल्या पांढरा असलेल्या रंगात भात, कांदा, लसूण, अंडे, दूध, फ्लॉवर, कोबी आदि घटक येतात. नंतरच्या पिवळा रंगात भाकरी, चपाती, वरण, पिवळी फळे, लिंबू, भोपळा, पेरु असे रोजच्या जेवणातील घटक असतात. तर, हिरवा रंग म्हणजे हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या आणि यातील लाल रंगाचे घटक अर्थातच फळभाज्या, टोमॅटो, गाजर, मांस, मिरची आदी.

Advertisement

अशा पद्धतीने चौरंगी आहार ही आपल्या रोजच्या जगण्यासाठी महत्वाची गरज आहे. कारण याद्वारे समतोल आहाराची व्याख्या पूर्ण होते. आपल्या रोजच्या जेवणात प्रिष्ठमय व स्निग्ध पदार्थ, प्रथिने, क्षार आणि सर्व जीवनसत्त्वे या सर्व घटकांची गरज असते. या सगळ्यांचा अन्नामध्ये पुरेसा समावेश असेल तरच शरीराचे पोषण योग्य पद्धतीने होते. आहारात ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी या अन्नधान्यांचा वापर आपण करतो. यामधील ज्वारी हा घटक पचण्यास आणि वजन न वाढविता योग्य पोषण करण्यासाठी खूप गरजेचा असतो.

Advertisement

तर, डाळी, शेंगदाणे, भाजीपाला, फळभाजी, फळे, तेल, तूप (गावरान तूप असल्यास उत्तम) हे पदार्थ रोजच्या रोज नाही खाल्ले तरीही एका-दोन दिवसाआड खावेच. यातील दूध, शेंगदाणे, ड्राय फ्रुट्स इत्यादींतून मिळणारी प्रथिने तुलनेने खूप ‘महाग’ प्रथिने आहेत. तर, ज्वारी आणि बाजरीतून मिळणारी प्रथिने मस्त आणि स्वस्त आहेत. त्यातही मांस, मासे हेही महाग प्रथिने आहेत. त्यातही अंडे सर्वात स्वस्त व परिपूर्ण असे प्रथिन स्त्रोताचे आगार आहे.

Advertisement

अशा पद्धतीने आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि रोगप्रतिकार शक्ती अर्थात इम्युनिटी पॉवर वाढीसाठी चौरंगी आहार आवश्यक आहे. आपण अनेकदा आहे तेच उपलब्ध पदार्थ किंवा आवडते पदार्थ खात राहतो. अशा पद्धतीने खात राहणे म्हणजे पैशांचा अपव्यय करण्यासह फ़क़्त खत करीत राहणे आहे. कारण, आपल्या शरीराला लागणारे सर्व घटक कोणत्याही एक-दोन पदार्थांमधून अजिबात मिळू शकत नाहीत. त्यासाठी वेगवेगळे आणि नैसर्गिक पद्धतीने खनिजे व जीवनसत्व आणि इतर घटकांनी युक्त असे पोषक अन्नपदार्थ आवश्यक असतात.

Advertisement

सध्याच्या करोना काळात अनेकांना इम्युनिटी वधव९ने कसे आवश्यक आहे याची महती पटली आहे. त्यासाठी प्रथिने आणि औषधी घटक असलेल्या काढ्यांचा वापर अनेकजण खूप जास्त प्रमाणात काहित आहेत. मात्र, फ़क़्त असेच घटक खाल्ल्याने आपली इम्युनिटी बुस्ट होईल असे गैरसमज अजिबात ठेऊ नका. समतोल आणि शुद्ध घटक असलेला आहार घेत राहा. उगीचाक कोणत्याही प्रचारकी थाटाच्या मेसेजला बळी न पडता आपल्या शेतात किंवा मार्केटमध्ये मिळणाऱ्या फळे, भाज्या आणि प्राणिज प्रथिने यांचाही जेवणात वापर करीत राहा. तसेच प्रसन्न आणि आनंदी लाइफस्टाइल जगा. कारण, इम्युनिटी पॉवर मोजण्याचे कोणतेही उपकरण अस्तित्वात नाही. त्यासाठी पोषक आहार आणि जीवनातील समाधान हेच दोन घटक महत्वाचे आहेत.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply