एकेकाळी बिसलेरी अर्थात बाटलीबंद पाण्याने हात धुणाऱ्या किंवा पिणाऱ्यांचे समाजात खूप कौतुक होते. गावोगावी निवडणूक झाल्या आणि ग्रामपंचायत किंवा सोसायटीचे सदस्य फोडून पळवण्यामध्येही हे बाटलीतले पाणी खूप महत्वाचे मानले जायचे. नंतर लग्नात त्याचा वापर सुरू झाला. आता तर त्या बाटलीतल्या पाण्याला काहीही किंमत उरलेली नाही. मात्र, आता हे पाणीच कसे अयोग्य आहे आणि आपण साधे पाणी पिल्याने होणारे आरोग्यदायी फायदे चर्चेत आहेत. कारण, हे जलचक्र जसे सुलटे फिरते, तसेच आता हे उलटे फिरत आहे.
बाटलीबंद पाणी हा प्रतिष्ठेचा विषय असल्याचे दिवस संपले. मात्र, आताही काहींना हेच पाणी बेस्ट वाटते. मात्र, वस्तुस्थिती याच्या अगदीच उलट आहे. बाटलीबंद पाण्याचा वापर म्हणजे जीवनातील एक अनावश्यक गरज बनली आहे. घराबाहेर पडलो आणि रस्त्यात तहान लागली तर पिण्याचे पाणी कोण देणार, असा नवा प्रश्न निर्माण झाल्याने या पाण्याचे महत्व वाढले आहे. जे आपल्या मानवतावादी दृष्टीकेनाला पुरता हरताळ फासणारे आहे.
आपण जर जुन्या काळातील विचार केला तर ‘पाणपोई’ ही संकल्पना आठवते की. त्यावेळी शेतात कामाला सगळेजण गेल्यावर वाटसरूंना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पाणपोई असायची. मात्र, काळानुरूप पाण्याच्या शुद्धतेचा मुद्दा पुढे आला आणि मग पाणपोई अपोआप बंद पडल्या. परिणामी बाटलीबंद पाणी गरजेचे वाटायला लागले. होय, प्रवासात याची गरज आहेच की. पण काहींना आपल्या कार्यालयात आणि घरातही बाटलीबंद पाणी असावे असेच वाटते. हा मात्र एक फोबिया आहे. कारण, घरातील स्वच्छ पाणी हे बाटलीबंद पाण्यापेक्षा नक्कीच स्वच्छ आणि निरोगी असते.
काही गोष्टी आपण पहिल्या दैस्ते की, बाटलीबंद पाण्याचा दरडोई वापर पाश्चात्य देशांमध्ये आहे. अमेरिकेत ४२ लिटर तर, युरोपात १११ लिटर इतके बाटलीबंद पाणी एक माणूस पितो. आपल्या भारतात तोच वापर खूप कमी आहे. तो आता कुठे दहाएक लिटरला पोहोचला आहे. आपल्याकडे नामांकित कंपन्या आणि संघटीत क्षेत्रातील बाटलीबंद पाणी उद्योग याचा वाटा तब्बल ४० टक्के इतका आहे. मात्र, गावोगावी आणि गल्लोगल्ली सुरू असलेल्या पाणी स्वच्छ करणाऱ्यांचा यातील वाटा ६० टक्के यापेक्षाही मोठा आहे.
युरोप-अमेरिकेत बाटलीबंद पाणी उत्तम दर्जाचे मिळते. मात्र, भारतात याची काहीच खात्री नाही. आपण उघड्यावर मिळते ते पाणी पिऊन बाटलीतल्या पेक्षा चांगले पाणी पितो असेच वाटण्याची परिस्थिती आहे. एका अहवालानुसार अये दिसते की, बाजारातील १३ पैकी १० कंपन्यांच्या बाटल्यामध्ये अनावश्यक घटक तरंगतांना थेट दिसतात. तपासणी केली तर हाच आकडा आणखी वाढेल. म्हणजे किमान ८० टक्के बाटल्यांमधील पाणी अस्वच्छ असण्याची शक्यता आहे. जसे आपल्याकडे आहे तसेच अमेरिकेतील ग्राहक भाबड्या समजुतीत आहेत की बाटलीबंद पाणी हे साधारण नळाच्या पाण्यापेक्षा फारच स्वच्छ, आरोग्यदायी व स्फुर्तीदायक असते.
वास्तव असे आहे की, अमेरिकेतील नळाद्वारे केला जाणारा पाणी पुरवठा हा जगातील सर्वात स्वच्छ समजला जातो. तरीही तेथे बाटलीतील पाण्याचा धंदा जोमात आहे. बाटलीबंद पाणी ही गरज नसून निर्माण केलेले एक अवडंबर आहे. त्यामुळेच आता कुठे हळूहळू का होईना नळाचे पाणी पिण्यास अयोग्य आहे असे समजणारी पिढी जन्माला येत आहे. भारतातही सध्या मुठभर श्रीमंत असलेले किंवा श्रीमंती मिरवणारे आपल्या चोचल्यांसाठी बाटलीबंद पाणी पितात. त्याचवेळी गरीब, कष्टकरी आणि दुष्काळी भागातील पाण्यासाठी त्राही भगवान करणारी जनता अजूनही टँकरकडे डोळे लावून आहे.
आपल्या भारतात अशी वाईट आणि विपरीत परिस्थिती आहे. एकाला खूप काही, तर दुसऱ्यांचे खायचे आणि प्यायाचेही वांधे असलेल्यांच्या भारत देशात आपण राहत आहोत. त्यातही सततचा दुष्काळ आणि पाण्याचा वाढता वापर यामुळे अनेकांना हक्काचे पिण्याचे पाणीही आपल्याकडे मिळत नाही. बुलेट ट्रेन, चांद्रयान अभियान, विश्वगुरू यांच्यासारख्या आभासी जगात आपण जगत आहोत. त्याचवेळी खायला आणि प्यायला मुबलक पाण्याची वाणवाही कायम आहे. त्यात बाटलीबंद पायाचा मुद्दा हा खूप गौण आहे.
संपादन व लेखन : माधुरी सचिन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक
- नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बनले आहेत ‘हे’ 9 यादगार विक्रम; जे नेहमीच प्रत्येकाच्या लक्षात राहतील
- एका दिवसात 6 लाख कोटींचा फटका; वाचा, नेमकं कशामुळे झालंय ‘एवढं’ नुकसान
- मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेर कार प्रकरणाचा पहिला पुरावा हाती; वाचा, पोलिसांनी नेमकं काय शोधलय
- सोन्याच्या भावात मोठी घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर