Take a fresh look at your lifestyle.

गावकीच्या पॉलिटिक्सचे ‘हे’ आहेत जगप्रसिद्ध फंडे; वाचा आणि त्यापासून बोधही घ्या

राजकारणात सगळे काही वाईट असते. असेच आपण म्हणतो, बोलतो, ऐकतो आणि सांगतो. अगदी गावात सरपंच असलेला किंवा केंद्रीय मंत्री झालेला व्यक्तीही राजकारण किती वाईट आहे हेच सांगत असतो. मात्र, असे म्हणतातच हे कुरघोडीच्या राजकारणात मुरलेले महाशय राजकारणातून निवृत्ती काही घेत नाहीत. कारण, इतरांनी यात येऊ नये आणि आपली खुर्ची धोक्यात अनु नये याचसाठी ही तोंडपाटीलकी चालू असते. मग आपण सगळ्यांनी त्या राजकीय फंदात पडावे का? तर नाही. सगळ्यांनी अजिबात हा अट्टाहास करू नये.

Advertisement

आपण केंद्र आणि जिल्ह्याच्या राजकारणावर कितीही तज्ञ म्हणून गिन्यान झाडत असलो तरी गावातील कुरघोडीचे राजकारण अनेकांना खूप अवघड वाटते. इथे आपल्या चांगुलपणाला कमी आणि बोगसगिरीला जास्त महत्व असते. गावासाठी धडपडणारे आणि मदतीला तत्पर असलेल्या अनेकांचा त्याच गावात राजकीयदृष्ट्या घाट होण्याची उदाहरणे आहेत की. त्याला जबाबदार तो संबंधित इसम आहे. कारण, बेजबाबदार असलेल्या मतदारांना मुळात जबाबदार असलेला व्यक्ती गावात आपला प्रतिनिधी म्हणून कसा आवडेल. उलट रेटून पण खोटे बोलण्याचा ‘गुण’ लोकांना मतदानासाठी आकर्षित करीत असतो.

Advertisement

आता मतदारांचे कौतुक पुराण बंद करून आपण गावातील ग्रामपंचायत किंवा सोसायटी यांची निवडणूक लढण्यासाठी नवख्यांनी काय काळजी घ्यायची यावर बोलूयात की. होय, नवख्यांनी या फंदात पडून आपल्याला हे झेपते किंवा नाही याची ट्रायल घ्यायला हरकत नाही. अनेकदा त्यात यशही मिळू शकते. मात्र, तो नियम नाही, तर अपवाद असतो. त्यामुळे लगेच हुरळून जाऊन गावासाठी आपले घर आणि व्यवसाय यांच्याकडे कोणीही अजिबात दुर्लक्ष करू नये. अनेकदा जुन्या प्रस्थापितांना आपल्यावर असलेली नाराजी दूर करण्यासाठी तरुणांना मदतीला घेऊन निवडून यायचे असते. कारण, गावातील सत्तेवर त्यांचे तालुका आणि जिल्ह्याच्या राजकारणातील गणित ठरलेले असते.

Advertisement

मग तुला हे पद देतो, तिकडे संधी देतो असे म्हणून नवीन मासे अर्थात होतकरू आणि नव्या दमाचे लोकमान्यता असलेले तरुण त्यांच्या गळाला लागतात. असे तरुण अनेकदा त्या अभिलाषेने आपले खूप जास्त वेळ आणि पैसे राजकारणात लावतात. एकदा निवडून आल्यावर मग कारणांची सरबत्ती करून अशा तरुणांना पदापासून दूर ठेवले जाते. मग आपणच किंवा आपल्याच कुटुंबातील एखाद्याला पद दिल्यावरच आपला ग्रुप कसा एकत्रित राहू शकतो हे पटवून दिले जाते आणि मग असे तरुण किंवा तरुणी फ़क़्त सदस्य म्हणून राहतात. कोणी कितीही लोकशाहीचा घोषा करीत राहो. गावात सरपंच करील तीच पूर्व दिशा असते.

Advertisement

त्यामुळे मी सदस्य होऊन काहीतरी दिवे लावीन असे अजिबात समजू नये. होय, अशी फसवणूक झाल्यावर एक पर्याय मात्र खुला असतो. तो म्हणजे आपणच विरोधी पक्षाची भूमिका बजावून संबंधित फसवणूक केलेल्या सरपंचांना विकासाचे काम करण्यासाठी सातत्याने दबावात ठेवणे. ग्रामपंचायतींच्या बैठकांना न जाण्याची आणि तिथे न जाऊनही फुशारकी मारण्याच्या आजाराची लागण बहुसंख्य ग्रामपंचायत सदस्यांना असते. असले बोगस सदस्य आपण बनू नये. उलट गावाच्या विकासाचे मुद्दे अशा बैठकीत जाऊन आग्रहाने मांडावेत. कारण, आपली फसवणूक जरी मित्राने, नेत्याने किंवा गटातील सदस्यांनी केली असली तरी गावाने अजिबात केलेली नसते. कुरघोडीच्या राजाराकाराचे आपण बळी असतो. मग अशावेळी गावाच्या कर्तव्याचे भान ठेऊन आपण गावासाठी आग्रहाने बैठकीत मुद्दे मांडावेत.

Advertisement

अशा पद्धतीने आपली फसवणूक झाली म्हणून लगेचच नकारात्मक विचारांच्या अडगळीत जाऊ नये. मात्र, एकदा फसवणूक झाल्यावर पुढील काळात आपल्याला हे प्रकरण झेपणार नसल्यास गावकीच्या राजकारणाला बाय-बाय करून आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करीत राहा. कुरघोडी जर जमत नसेल तर आणि गावातील मतदार जर सुज्ञ नाहीत असे समजले तर मग राजकारणातून थेट बाहेर पडून आपल्या कामात व्यस्त राहण्याचा खुला आणि बेस्ट पर्याय खुला आहेच की. त्यासाठी एकदा याचा अनुभव घेऊन मगच आपण त्यातले आहोत किंवा नाही हे तपासून पहा..!

Advertisement

लेखन व संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply