Take a fresh look at your lifestyle.

गावकीच्या राजकारणात ‘ही’ घ्यावी काळजी; नाहीतर जीवनामध्येच येऊ शकते काजळी..!

राजकारण म्हणजे अजब तऱ्हा. तिथे चांगुलपणा मागून येतो अगोदर जिंकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी महत्वाच्या ठरतात. भारतात राजकारण वाईट आहे असे कितीही म्हटले जात असले तरी ते बदलावे आणि त्यातल्या त्यात चांगल्या लोकांनी तरी यात यावे अशी मनोमन इच्छा कोणाचीही नाही. कुटुंबात गप्पा मारताना, कट्ट्यावर लक्ष वेधायला आणि सोशल मीडियामध्ये फुशारकी मिरवायला राजकारणात चांगुलपणाचा मुद्दा चघळला जातो. अशावेळी आपण आज पाहणार आहोत गावकीच्या राजकारणात काळजी घेण्याचे मुद्दे.

Advertisement

गावात वर्षानुवर्षे एकाच किंवा जास्तीतजास्त दोन कुटुंबांची सत्ता अबाधित असते. कित्येकदा तर दोन्ही बाजूला एकाच कुटुंबातील भाऊ-भाऊ, चुलत भाऊ किंवा चुलते-पुतणे असतात. तेच गावात आळीपाळीने सत्ता उपभोगत असतात. अनेक गावांमध्य हीच परिस्थिती आहे. त्याला जबाबदार आहोत आपण सगळे बेजबाबदार मतदार. होय, केंद्रातील घराणेशाही न आवडणारे आपण सरपंच, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि खासदार निवडताना कोणाचाही पोरगा, बायको, पुतण्या, आई, वडील, भाऊ आणि भाचा यांना संधी देतोच कि. अशा पद्धतीने आपल्या मनामनात आणि हृदयात घराणेशाही आहे. जुन्या राजेशाही विचारांचा हा परिपाक आहे.

Advertisement

म्हणजे घराणेशाही १०० टक्के वाईट असेही नाही. एखाद्याचा बाप किंवा आजोबा मोठा होता म्हणजे हा तसाच असेल किंवा नसेलच असे म्हणायला काहीही वाव नाही. मात्र, त्यावेळी मतदान करताना संबंधितांचा चांगुलपणा, शिक्षण आणि मुख्य म्हणजे सामाजिक भान व समज किती आहे यालाच महत्व असावे. मात्र, आपल्याकडे दिसणे आणि त्यातही महत्वाचे म्हणजे पैसा आणि रेटून पण खोटे बोलण्याचा ‘गुण’ हाच जिंकण्यासाठी महत्वाचा असतो.

Advertisement

कित्येकदा सामाजिक भाव आणि समज नसल्याने शिकलेले आणि कोणत्याही क्षेत्रात ग्रेट असलेली मंडळी मतदान करताना विवेकबुद्धी अजिबात शाबित ठेवत नाहीत. हा आपल्या भावाकीचा, जातीचा, धर्माचा आणि शेजारचा (किंवा प्रांताचा) असल्याने असे उच्चशिक्षण घेतल्याचा दावा करणारेही मतदान बोगस व्यक्तीलाच करून मोकळे होतात.

Advertisement

देशभरातील गावोगावी हीच परिस्थिती आहे. तशीच आपल्याही गावात असते. त्यामुळे गावातील राजकारणात मतदान करताना आपण वरील सांगितलेल्या अवगुणांचे धनी तर नाहीत ना हे एकदाचे मनोमन समजून घ्या. कारण, आपण लोकांची फसवणूक करू शकतो आपली स्वतःची अजिबात फसवणूक करू शकत नाही. त्यातही सर्वात महत्वाचे म्हणजे आपण समाजाला वाईट वळणावर तर नेट नाहीत ना हेही समजून घ्या. अनेकदा आपण फसतो. मात्र, फसलो आहोत हे समजून घेऊन आपल्या भूमिकेत योग्य तो बदल करा.

Advertisement

दगडापेक्षा वीट मऊ वाटणाऱ्या मंडळींकडून मतदार म्हणून आपली फसवणूक होणार नी याची काळजी घ्या. अनेकदा एखाद्याचे वडिलांनी गावाला खूप लुबाडलेले असते. त्यांचाच मुलगा साळसूद असल्याचा आव आणून आपल्याला फसवू शकतो. अशावेळी विरोधात कोणीतरी त्रास देणारा असल्याने आपण पुन्हा एकदा घराणेशाहीचा वारस मोठा करतो. मात्र, त्यामुळे आपल्याला आणि संपूर्ण गावाला मनस्तापही होऊ शकतो. जरी पहिल्या टप्प्यात त्यामुळे फसवणूक झालीच तर पुन्हा अशा चूका करून गावाच्या विकासाला ब्रेक लावण्याचे अवगुण अजिबात उधळीत बसू नका.

Advertisement

गावातील राजकारण म्हणजे कुरघोडीचे आगार असते. त्यामध्ये आपणही जास्त कुरघोडी करीत बसू नका. कारण, त्यामध्ये आपला कार्यक्षम असलेला प्रोडक्टिव वेळ आणि मुख्य म्हणजे पैसा खर्च होऊ शकतो. अखेरीस त्यातून दुसर्यांना जसा मनस्ताप होतो तसंच आपल्यालाही तोच मनस्ताप वाट्याला येतो. त्यामुळे आजच्या पहिल्या भागात आपण मतदार म्हणून गावात काय करीत बसू नये हे पाहिले. पुढच्या भागात निवडणूक लढताना कोणती काळजी घ्यावी. याचा उहापोह करणार आहोत.

Advertisement

लेखन व संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply