Take a fresh look at your lifestyle.

ADCC निवडणूक : कर्डिलेंच्या विरोधात उमेदवार कोण; राष्ट्रवादीचे नेतेही भाजपच्या गोटात

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अशावेळी नगर तालुक्यातून महाविकास आघाडी भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात कोणता उमेदवार देणार की ते पुन्हा एकदा बिनविरोध निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

नगर तालुक्यातील १०९ सोसायट्यांपैकी १०० ठराव आपल्याकडे असल्याचा दावा कर्डिले यांनी केला आहे. आतापर्यंत तालुक्यामध्ये केलेल्या विकास कामाची पावती म्हणून सोसायटी संचालक पाठीशी असल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे.

Advertisement

त्यांनी महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनाच घेऊन मोठे शक्तिप्रदर्शन करीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा अर्ज भरला आहे. त्यावेळी संभाजी लोंढे, भिमराज आव्हाड, सुरेशराव सुंबे आदी उपस्थित होते.

Advertisement

कर्डिले म्हणाले की, खेळत्या भांडवलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना आधार दिला. १४० कोटींचे कर्ज वाटले. त्यामुळे माझ्या विरोधात उमेदवार शोधण्याची वेळ विरोधकांवर आली आहे. १०९ सोसायट्यांपैकी १०० ठराव आपल्याकडे आहेत. विकासकामांची पावती म्हणून दहा वर्षांपासून मी बिनविरोध निवडून येत आहे. मी शेतकरी हिताचेच निर्णय घेतले. गायी, म्हशी घेण्यासाठी, तर महिलांना लघुद्योग चालू करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून अर्थसाहाय्य केले. महाआघाडीकडे फक्त नऊच सोसायट्या शिल्लक राहिल्या आहेत, तरीसुध्दा मला बिनविरोध येऊ द्यायचे नाही, म्हणून ते विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत. ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ४५ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply