Take a fresh look at your lifestyle.

आता ‘या’ भाजपच्या बड्या नेत्यांनीच केली विश्वास नांगरेंकडे मागणी; रेणु शर्मावर गुन्हा दाखल करा

मुंबई :

Advertisement

राज्याच्या राजकीय पटलावर अजूनही रेणु शर्मा आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे प्रकरण गाजत आहे. मुंडेंविरोधात प्रचंड आक्रमक झालेली रेणु शर्मा हीने तक्रार मागे घेतल्यावर अनेक शंका घेतल्या जात आहेत. दरम्यान आता एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Advertisement

पूर्वीच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा आणि आताच्या भाजप प्रदेशाध्यक्षा असणार्‍या चित्रा वाघ यांनी मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे यांची भेट घेत रेणु शर्मावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणु शर्माकडून खोटा आरोप करण्यात आला. त्यामुळे आता रेणु शर्माविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसंबंधी त्यांनी प्रसिद्ध पोलिस अधिकारी विश्वास नांगरे यांची भेट घेतली आहे.

Advertisement

याविषयी बोलताना त्या म्हणल्या की, हे प्रकरण धनंजय मुंडे किंवा रेणू शर्मा यांच्यापुरतं मर्यादित नाही. या प्रकरणात योग्य कारवाई झाली नाही तर त्याचे दूरगामी परिणाम राज्यातील लेकीबाळींना भोगावे लागतील. त्यासाठी तात्काळ कारवाई व्हावी. बलात्कारासारखा गंभीर आरोप करून तो पुन्हा मागे घेणं हा काही खेळ नाही. अशा घटनांमुळे राज्यात चुकीचा संदेश जाऊ शकतो.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply