मुंबई :
महाराष्ट्राचे फायरब्रॅंड नेते व मनसेप्रमुख राज ठाकरे हे नेहमीच ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत असतात. कोणाशी युती नाही, कोणाशी आघाडी नाही, अशी त्यांची भूमिका सर्वश्रूत आहे. आता अशातच मनसे भाजपअशी युती करण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. विधानपरिषद आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला होता. परिणामी यावेळी भाजप अधिक सावध असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मनसेसोबत युती करणार असल्याच्या चर्चां जोर धरु लागल्या आहेत. अशातच भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज यांचे निवासस्थान कृष्णकुंजवर येथे भेट दिली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. जवळपास अर्धा तास ही बैठक चालू असल्याची माहिती मिळाली आहे.
या बैठकीनंतर आमदार लाड यांनी अत्यंत महत्वाचे विधान केले आहे. यावेळी कृष्णकुंजवरुन बाहेर पडल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत भाजपचाच महापौर बसेल आणि योग्य वेळी उत्तर दिलं जाईलं, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
या भेटीविषयी विचारले असता ते म्हणाले की, शिवसेनेची परंपरागत असलेली सत्ता आम्ही काढून घेणार आहोत. आमच्यासोबत जे लोकं येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. मनसेसोबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आजची भेट ही केवळ वैयक्तिक आणि मैत्रीची भेट होती. राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळेच त्यांची भेट घेतली.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक
- नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बनले आहेत ‘हे’ 9 यादगार विक्रम; जे नेहमीच प्रत्येकाच्या लक्षात राहतील
- एका दिवसात 6 लाख कोटींचा फटका; वाचा, नेमकं कशामुळे झालंय ‘एवढं’ नुकसान
- मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेर कार प्रकरणाचा पहिला पुरावा हाती; वाचा, पोलिसांनी नेमकं काय शोधलय
- सोन्याच्या भावात मोठी घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर