Take a fresh look at your lifestyle.

‘हे’ चित्र महाराष्ट्राची राजकीय संस्कृती सांगणारं; वाचा, काय घडले बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरणप्रसंगी

मुंबई :

Advertisement

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून ते राज ठाकरे, प्रवीण दरेकरांपर्यंत अनेक नेते उपस्थित होते. 

Advertisement

बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रम प्रसंगी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सहकुटुंबीय एकत्र आले. तसंच, शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांसह विरोधी पक्षातील नेतेही हजर होते. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे.

Advertisement

सर्वपक्षीय नेते उपस्थित असताना अजित पवार का नाही आले, असा प्रश्न पत्रकारांकडून आल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की अजित पवार पुण्यात असल्यामुळे येऊ नाही शकले.

Advertisement

नेमकं कोण कोण होतं उपस्थित :-

Advertisement

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत तसंच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, एकनाथ शिंदे, अनिल देसाई हे नेतेही उपस्थित होते.

Advertisement

या कार्यक्रमा निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. 14 महिन्यांनंतर या दोन भावांची भेट झाली.

Advertisement

एकीकडे निवडणूक काळात किंवा अन्य राजकीय व्यासपीठावर हीच राजकीय मंडळी एकमेकांवर जोरदार टीका करत असतात, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असतात. पण अशा कार्यक्रमामध्ये मात्र राजकीय पक्षाचे एकत्र येतात. हे चित्र महाराष्ट्राची राजकीय संस्कृती सांगणारं आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply