Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दोन खासदारांचे आंदोलन; भाजपचे खासदारही बसले 6 मागण्यांसाठी अडून

दिल्ली :

Advertisement

शेतकऱ्यांचे आपणच कसे कैवारी आहोत हे भासवण्याचा प्रयत्न प्रत्येक नेता आणि राजकीय पक्ष करीत असतो. राजस्थान राज्यातही आता दिल्लीतील कृषी कायद्याच्या विरोधातील वातावरण तापले आहे. त्यासाठी दोघेजण खासदार आंदोलन करीत आहेत. एकजण पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या, तर एक भाजपचे खासदार राजस्थान राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात रिंगणात आहेत.

Advertisement

केंद्र सरकारने देशात आणलेल्या नवीन कृषी बिलेबाबत देशभरात जोरदार गोंधळ उडाला आहे. एकीकडे शेतकरी ही बिले रद्द करावी या मागणीसाठी धरणे लावून बसले आहेत तर दुसरीकडे काहीजण हेच कसे योग्य कायदे आहेत याचा रागरंग दाखवत आहेत.

Advertisement

एकूणच राजकीय कॉरिडॉरमध्ये यामुळे खळबळ उडाली आहे. राजस्थानमध्येही या बिलांबद्दल राजकारण तापले आहे. राजस्थानमधील दोन खासदार शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी धरण आंदोलन करीत आहेत. गेहलोत सरकारच्या विरोधात दौसा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपचे खासदार डॉ. किरोरी लाल मीणा बसले आंदोलन करीत आहेत.

Advertisement

तर, अलवरच्या शाहजहांपूर-खेडाच्या बोर्डावर मोदी सरकारच्या निषेधार्थ नॅशनल डेमोक्रॅटिक पक्षाचे नागौर खासदार हनुमान बेनीवाल यांनी आपला मोर्चा उघडला. विशेष म्हणजे दोन्ही नेते वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे असल्याने एकाचवेळी आपल्या विरोधातील पक्षाचे सरकार कसा अन्याय करीत आहे हेच सांगत आहेत.

Advertisement

राज्यसभेचे खासदार डॉ. किरोडी लाल मीणा 6  कलमी मागण्या घेऊन आंदोलक बनले आहेत. जिल्हाधिकारी व अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊनही खासदारांचा संप अद्यापपर्यंत सुरू आहे. मागच्या सरकारने वीज बिलात दिलेली अनुदानी सूट पुन्हा लागू करणे आणि इंधन शुल्काच्या नावावर आकारण्यात येणारी रक्कम तातडीने अंमलात आणण्याशी संबंधित मागण्यांचा समावेश त्यात आहे.

Advertisement

तर, खासदार हनुमान बेनीवाल हे गेल्या 28 दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ आंदोलन करीत आहेत. ते आपल्या शेकडो समर्थकांसह बेनीवाल हेदेखील ठाम आहेत की जोपर्यंत केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शांततेत बसून राहतील.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply