मध्यप्रदेशातील भोपाळ येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राजभवनावर मोर्चा काढला होता. यावेळी कार्यकर्त्यांना रोखताना पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले. तसेच लाठीचार्ज केल्याने शेकडो जखमी झाल्याचे वृत्त आहे.
पोलिसांनी राजभवनाला घेराव घालणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर वॉटर कॅनॉनचा (पाण्याचे फवारे) वापर केला. तसेच लाठीचार्जांचा वापर केला आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज झाल्यानंतर मध्यप्रदेश कॉंग्रेसने ट्विट करून पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध केला.
कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज म्हणजे शिवराजांच्या हुकूमशाहीने ब्रिटिश राजांची आठवण करून दिली आहे. भोपाळमध्ये शांततेत निदर्शने सुरु असताना लाठीचार्ज, अश्रुधूर व वॉटर कॅनन्सचा उपयोग हे गुलामीच्या काळातील ब्रिटिशांच्या दडपशाहीची आठवण करून देणारे आहे. शिवराजजी, तुमचा काउंटडाउन सुरू झाला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
गेल्या आठवड्यातही मध्यप्रदेश कॉंग्रेसने कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सरकारच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. गेल्या आठवड्यातही या रॅलीत सहभागी असलेले माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, मध्यप्रदेशमधील बहुतांश शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनाचा किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळाली नाही आणि तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी केल्यास हे शेतकऱ्यांना पैसे न मिळण्याचे संकट आणखी वाढेल. त्याचबरोबर दिग्विजय सिंह म्हणाले की, हे तीनही कृषी कायदे पूर्णपणे शेतकरी हिताच्या विरोधात आहेत.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com