म्हणून बाळासाहेबांचे नाव ‘बाळ’ ठेवले गेले; वाचा महाराष्ट्राला अभिमान वाटणार्या या नावामागची रंजक गोष्ट
बारामती :
प्रबोधनासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणार्या प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना वयाच्या 41 व्या वर्षी मुलगा झाला. त्यावेळी ते पुण्यात राहात होते. ‘जगदंबेच्या ओटीत टाकलेला बाळ’ ही बाळासाहेबांच्या नावाशी जोडलेली ही कथा सर्वश्रूत आहे. बाळासाहेबांचे धाकटे बंधु आणि मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचे वडिल श्रीकांत ठाकरेंनी यांनी सांगितलेली ही कहाणी उभ्या महाराष्ट्राला माहिती असली तरी इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी बाळ या नावाविषयी वेगळीच कहाणी समोर आणली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जवळचे सहकारी बाळाजी आवजी यांच्या नावावरून
‘बाळ’ हे नाव ठेवले गेल्याचे ते म्हणतात.
पेशवाईतील ब्राम्हणी वर्चस्ववादाच्या दुराग्रहाच्या विरोधात लढा देणार्या चांद्रसेनीय कायस्थप्रभू समाजाचा अभिमान म्हणून ते प्रबोधनकार यांच्या साहित्यात अधून मधून सापडतात. त्याचाच प्रभाव म्हणून ‘बाळ’ हे नाव ठेवले असल्याचा कयास मोरे यांनी मांडला.
कोण होते बाळाजी आवजी :-
- स्वराज्याच्या कारभाराची मुहुर्तमेढ रचण्यात त्यांचा सिंहाचा वाटा
- स्वराज्याचे चिटनीस
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक
- नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बनले आहेत ‘हे’ 9 यादगार विक्रम; जे नेहमीच प्रत्येकाच्या लक्षात राहतील
- एका दिवसात 6 लाख कोटींचा फटका; वाचा, नेमकं कशामुळे झालंय ‘एवढं’ नुकसान
- मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेर कार प्रकरणाचा पहिला पुरावा हाती; वाचा, पोलिसांनी नेमकं काय शोधलय
- सोन्याच्या भावात मोठी घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर