Take a fresh look at your lifestyle.

पवारांचा ‘दुटप्पीपणा’ : एका बाजूला कृषी कायद्यांना विरोध; दुसरीकडे चालूये ‘ते’ काम

बारामती :

Advertisement

कृषी कायद्यांवर विरोधात महाविकास आघाडी सरकारने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी कॉंट्रॅक्ट फार्मिंगशी सबंधित असलेल्या कृषी कायद्यांना कडवा विरोध केला. मात्र आता पवारांच्याच बारामतीत पवारांचा दुटप्पीपणा समोर आला आहे.

Advertisement

बारामती येथे रोहित पवार आयोजित कृषिक या कृषी नावीन्यपूर्ण प्रदर्शनात रोहित पवार प्रमुख असलेल्या बारामती अग्रो या कंपनीने कॉंट्रॅक्ट फार्मिंग म्हणजेच करार शेतीचे फायदे सांगितले आहेत. त्याचे फ्लेक्सही पद्धतशीरपणे लावण्यात आले आहेत. एका बाजूला कॉंट्रॅक्ट फार्मिंगशी सबंधित असलेल्या कृषी कायद्यांना विरोध करायचा आणि दुसर्‍या बाजूला कॉंट्रॅक्ट फार्मिंग कसे योग्य आणि फायदेशीर आहे, हे सांगायचे. अभ्यासू नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला परिचित असणार्‍या रोहित पवारांची दुटप्पी भूमिका शेतकरी मित्रांना मात्र पटलेली नाही.

Advertisement

द फार्म या संस्थेचे रितेश पोपळघट यांनी हा प्रकार सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्या राजकारणी मंडळींच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या कंपन्यांचे बॅनर पाहून आनंद झाला’, असा टोलाही यावेळी पोपळघट यांनी हानला.  

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply