Take a fresh look at your lifestyle.

केंद्र सरकार टरकले; ‘त्या’ भागात दिले जात नाहीये ट्रॅक्टरला इंधन

दिल्ली :

Advertisement

दिल्लीत कडाक्याच्या थंडीत अजूनही पंजाब, हरियाणा आणि देशभरातील शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. सरकार आणि आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये तब्बल अनेक बैठका झाल्या असून अद्यापही त्यातून तोडगा निघलेला नाही. आता सरकारने नरमाईची भूमिका घेता कायद्याला 2 वर्ष स्थगिती दिली असली तरी शेतकर्‍यांचे आंदोलन सुरूच आहे.

Advertisement

आता 26 जानेवारीला शेतकरी अजून आक्रमक होत ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. मात्र या मोर्चाला केंद्र सरकार टरकले असल्याचे दिसून येत आहे. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरसाठी पेट्रोल अथवा डिझेल मिळणार नसल्याच्या पाट्या पेट्रोल पंपांवर लागलेल्या आहेत.

Advertisement

दिल्ली आणि आसपासच्या परिसरात ट्रॅक्टरवाल्यांना इंधन देण्यास बंदी का घातली आहे? कुणी घातली आहे? या मागे नेमका कुणाचा हात आणि स्वार्थ आहे, असे बरेच प्रश्न नागरिकांमधून विचारले जात आहेत. फक्त ट्रॅक्टरच नाही तर बाटलीतही पेट्रोल देणे बंद केले आहे. याचाही निषेध देशभरातील शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply