Take a fresh look at your lifestyle.

ऑस्ट्रेलिया आक्रमक; गुगलला सुनावले, वाचा मिडिया पेमेंट कायद्याचा वाद नेमका कशावरून

सध्या जगभरात दोन बलाढ्य कंपन्यांची चलती आहे. देशोदेशीच्या सरकारी यंत्रणा आणि सत्तेतील राजकीय नेते व पक्षांना हाताशी धरून त्या कंपन्या आणखी फोफावत आहेत. त्या दोन कंपन्या म्हणजे फेसबुक आणि गुगल. कारण, एकूण कमाईत त्यांचा वाटा खूप मोठा आहे.

Advertisement

याच कंपन्यांना वेसन घालताना माध्यम समूहांना आणि लेखक, पत्रकार व क्रियेटीव्ह मंडळींना नफ्यातील वाटा देण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने चक्क नवा कायदा आणला आहे. या मिडिया पेमेंट कायद्यामुळे या दोन्ही कंपन्यांना आपल्यातील वाटा मूळ लेखक आणि कलाकारांना द्यावाच लागणार आहे. त्यामुळे आता गुगल कंपनीने सर्च इंजिन बंद करण्याची धमकी ऑस्ट्रेलिया सरकारला दिली आहे.

Advertisement

नव्या कायद्यावरून गुगलने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर ऑस्ट्रेलियातून सर्च इंजिनची सेवा बंद करण्याची धमकीही दिली आहे. त्याला पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी कडक शब्दांत सुनावले. ते म्हणाले की, धमक्यांपुढे झुकणार नाही. आॅस्ट्रेलिया स्वत:चे नियम तयार करतो. संसदेत तो तयार होतो. ऑस्ट्रेलियात काम करू इच्छित असाल तर स्वागत आहे. परंतु धमक्यांना उत्तर दिले जाणार नाही. दोन्ही कंपन्यांना जास्त शक्ती मिळणे लोकशाहीसाठी घातक आहे.

Advertisement

त्यावर तेथील केंद्र सरकारने खमकी भूमिका घेत गुगल कंपनीला सुनावले आहे. सर्च इंजिन व ऑस्ट्रेलिया सरकार यांच्यात मीडिया मोबदला कायद्यावरून एक महिन्यापासून वाद सुरू आहे. जगात पहिल्यांदाच अशा प्रकारचा कायदा तयार केला जात आहे. स्थानिक मीडिया कंपन्यांच्या बातम्या सर्च इंजिनवर दाखवण्यासाठी पैशांचा मोबदला द्यावा लागू शकतो. या प्रस्तावावर संसदेत चर्चा सुरू आहे. लवकरच मतदानही होऊ शकते. टेक कंपन्यांनी त्यास विरोध केला आहे. तसे झाल्यास इतर देशही असा कायदा लागू करतील, अशी भीती टेक कंपन्यांना वाटते. 

Advertisement

गूगलचा जागतिक बाजारपेठेतील वाटा ८८.१४ टक्के राहिला आहे. बिंगचे बाजारातील भाग ६.१८ , याहू-४ टक्के आहे. यांडेक्स, बायडूचे ०.५९ टक्के आहे. १९९७ मध्ये सुरू झालेले गुगल मार्केट लीडर राहिले आहे. या कंपनीला जाहिराती, प्रॉडक्टिव्हिटी टूल्स, व्यावसायिक उत्पादनांतून जास्त उत्पन्न होते. कंपनीचा व्याप मोबाइलसह इतर उत्पादनांपर्यंत पसरला आहे. ऑस्ट्रेलियातून वार्षिक ३० हजार कोटींचे उत्पन्न मिळत असल्याने गूगल  आपल्या नफ्यात कोणीही वाटेकरी नकोत यासाठी लढत आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply