दिल्ली :
मुजोर, स्वार्थी आणि दुसर्याला अडचणीत आणण्याचा नादात स्वत: तोंडावर पडणे, हे पाकिस्तानचे स्थायी गुण आहेत. ज्यात आजवर कधीही बदल झालेला नाही. भारताने आजवर अनेकदा दिलदारपणा दाखवूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार, भारताला नमावण्याच्या नादात स्वत:च तोंडावर पडले आहे. विशेष बाब म्हणजे पाकिस्तानची अशी तोंडावर पडण्याची पहिलीच वेळ नाहीये.
आधीच कर्जाच्या खाईत असलेल्या पाकिस्तानने अजून हाताने पायावर कुर्हाड मारून घेतली आहे. र्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने भारताविरुद्ध क्रिकेटच्या मैदानात तोंडघशी पडल्यांनंतर एका खटल्यासाठी 33 कोटींहून अधिक खर्च केला आहे. ही गोष्ट समोर आल्यावर पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यात अजून एक महत्वाची बाब म्हणजे याबदल्यात पाकिस्तानला भारताकडून एक रुपयादेखील परत मिळालेला नाही.
एवढेच नाही तर पाकिस्तानने अर्थव्यवस्था चालविण्यासाठी पुन्हा एकदा 1.2 अब्ज डॉलर्स (, 87,56,58,00,000 रुपये) नवीन कर्ज घेतले आहे. सध्या तिथे असणारे इमरान खान सरकार अतिशय अकार्यक्षम असल्याचे म्हटले जात आहे. तेथील सरकारी यंत्रणाही अतिशय बिकट परिस्थितीत आहे. यंत्रणेतील लोकांना पगार मिळत नसल्याचेही समोर आले आहे.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com