चहा आणि भारतीयांचे एक अतूट नाते आहे. भारतातील लोकांसाठी चहाला वेळ नसते मात्र वेळेला चहा लागतोच. आपण चहा पिऊन झाल्यावर त्याचा पावडरचा जो चोथा असतो तो फेकून देतो. आपल्याला त्याचा फायदा माहिती नसल्यामुळे आपण चोथ्याला केराची टोपली दाखवतो. आज आम्ही आपल्याला चहाच्या चोथ्याचे असे फायदे सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही चाचाचा चोथा कधीच फेकुन देणार नाहीत.
असे आहेत फायदे :-
- कोरा किंवा काळा चहा केल्यानंतर त्याच्या उरलेल्या चोथ्याचा पाणी घालून पुन्हा एकदा चहा उकळून घ्या. मग चहाचे पाणी थंड करुन केसांच्या मुळाला लावा. हे पाणी लावल्यानंतर थोडासा मसाज करुन तुम्ही तुमच्या शॅम्पूने केस धुवू शकता. हे केल्यास आपले केस चमकदार होतील
- उरलेला चोथा दहा मिनिटांसाठी डोळ्यांखाली ठेवा. डोळ्याखालील काळी वर्तुळंसुद्धा कमी होतील. हा प्रयोग आठवड्यातून किमान 3 दिवस करावा.
- उरलेली चोथा टिश्यू पेपरमध्ये किंवा मलमलच्या कपड्यात बांधून ती फ्रिजमध्ये ठेवा. ज्यामुळे फ्रीजमधील विविध पदार्थांचा उग्र वास येणार नाही.
- उरलेल्या चोथा उपयोग तुम्ही फर्निचर स्वच्छ करण्यासाठी तसेच चमकवण्यासाठी करू शकता.
- उरलेल्या चोथा खत म्हणून वापरु शकता. फक्त खत टाकण्यापूर्वी चोथा वाळवून घ्यावा.
संपादन : संचिता कदम