IMP : प्रायव्हसीचा झालाय असा बट्ट्याबोळ; पहा ‘असले’ अनुभव तुम्हाला तर आलेले नाहीत ना..?

सध्या व्हाटस्अॅप या मोबाईल मेसेजिंग अॅप्लिकेशनच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा ट्रेंड आहे. अनेकांनी नव्या धोरणांमुळे आपल्या वैयक्तिक बाबींवर घाला येण्याच्या भीतीने व डेटाचा चुकीचा वापर होण्याच्या शक्यतेने व्हाटस्अॅपला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी प्रायव्हसीचा नेमका कसा बट्ट्याबोळ झालाय याकडे लक्ष वेधले जात आहे. अहमदनगर लाइव्ह 24 या न्यूज पोर्टलचे संस्थापक-संपादक तेजस शेलार यांनीही व्हर्च्युअल जगात येत असलेले अनुभव फेसबुकवर शेअरले आहेत.

आम्ही त्यांचे लेखन अगदी जसेच्या तसेच प्रसिद्ध करीत आहोत. आपणास असा कोणताही अनुभव आलेला असेल तर प्रतिक्रिया लिहा किंवा krushirang@gmail.com यावर आम्हाला लिहा. आम्ही त्यास प्रसिद्धी देऊ.

शेलार यांची पोस्ट अशी :

अमेरिकेतील निवडणुका चालू असताना एक दोन वेळा मी ह्याबाबत गुगल सर्च केले होते त्यावेळी माईक ब्लुमबर्ग फॉर अमेरिका ह्या आशयाच्या सरार्स जाहिराती दिसत होत्या मी भारतात असूनही !

रेस्टोरंट नियर मी असा सर्च मी शहराबाहेर असलो तरी मला झोमॅटो नाहीतर स्वीगीचा मेसेज येतो आणि हंगरी वैगेरे बोलून ते आणखीच भूक वाढवितात.

हॉस्पिटल शोधले तर कुठल्यातरी ऑनलाईन app ची जाहिरात दाखविली जाते.

आई मला म्हणते इतके पैसे रेंट भरतोस त्या पेक्षा घर बांध

मी फेसबुक वर येताच माझ्या शहरातल्या रिअल इस्टेट आणि होम लोनच्या जाहिराती दिसतात

मी माझे क्रेडीट कार्ड चे बिल भरायचे असे नोटस app मध्ये टाईप करतो

तोच मला अमेरिकन एक्स्प्रेस आणि आरबी एल बँकेच्या क्रेडिट कार्ड्सच्या जाहिराती दिसू लागतात

एका बँकेतून मी लाईट बिल AutoPay केल आणि त्या तारखेला ते कट झाल्याचा मसेज आला कि दहा पंधरा मिनिटांत दुसर्या बँकचाही आमच्याकडेही अशी सुविधा उपलब्ध आहे असा संदेश येतोच (पैसे भरले असले तरी हे विशेष)

मी पॉलिसीबझार वर इन्श्युरन्स प्रीमियम चेक केल्यानंतर पुढचे दहा दिवस जवळपास वेगवेगळ्या कंपन्यांचे दहा पेक्षा जास्त फोन येतातच

ट्रेडिंग सुरु केले कि वेगवेळ्या ब्रोकर फर्म्स चे फोन येतात

एवढच काय गमतिने एखादा मित्र लग्न कधी करतोस असा जरी चॅट मध्ये असेल तर त्याच्या दुसर्या मिनिटात शादी.कॉम सारख्या साईटची जाहिरात दिसतेच.

यातील काही गोष्टी गुगल कीवर्ड / सर्च / AI आणि कस्टमर केअर / कॉल्स डेटा वैगेरे मुळे होते हे मान्य पण ते ह्या सर्व कंपन्यांनी आपल्या फोनचाही ताबा घेतलाय अस किमान मला तरी जाणवतंय

गेल्या एक दोन वर्षातील हे माझ्या सोबत घडलय.

आपण जे काही बोलतो , लिहितो , ऐकतो त्या त्या विषयावरील जाहिराती आपल्याला दाखविल्या जात आहेत

आणि कधी कधी त्याचा अतिरेक होतोय.

माझा inbox इंस्युरंस, बँक ऑफर्स, पॉलिसीज , डोमन्स , होस्टींग्स , कार्स ,मोबाईल्स ने भरलाय दररोज नाही म्हंटल तरी चार दोन कॉल्स येतातच अलीकडे तर मेलबॉक्स चा spam फोल्डर फक्त ऑफर्सने भरलेला असतो

काय प्रायव्हसी राहिलीय ?

मला तरी वाटते आपण जो काही मोबाईल वापरतोय तो आपले सर्व संदेश वाचत असेल आणि बोलणेही एकत असेल

आणि ह्या जाहिराती दाखवत असेल ?

तुमच्यासोबत झालेय असे काही ???

Facebook Link : Tejas B Shelar | Facebook

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here