फ्लिपकार्टचा एक साधा डिलीवरी बॉय, आज बनलाय फ्लिपकार्टचा एसोसिएट डायरेक्टर; वाचा महिन्याला 6 लाख रुपये कमावणार्‍या अंबरची प्रेरणादायी कहाणी

सोहनलाल द्विवेदी यांची एक प्रसिद्ध कविता आहे. जी आपण अनेकदा ऐकली आहे. ‘लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती.’ ही कविता अंबर आईयपा ( Ambur Iyyappa) यांच्याबाबतीत खरी ठरताना दिसते.

साधारण 2009 मध्ये Ambur Iyyappa हे साधारण व्यक्ती होते. जे बेंगलोरमध्ये फर्स्ट फ्लाइट कुरियर्स या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. अचानक एक दिवशी त्यांच्या मनात काहीतरी वेगळे स्किल शिकावे, असे डोक्यात आले. अखेर त्यांनी 3 महिन्यांची सुट्टी घेतली. ते एक स्किल शिकून पुन्हा कंपनीत कामासाठी आले. तेव्हा मात्र त्यांच्यासाठी कोणतेही काम शिल्लक नव्हते. त्यांचा जॉब गेलेला होता.

आता मात्र Ambur टेंशनमध्ये होते. योगायोग म्हणजे त्यावेळी Flipkart ची कूरियर पार्टनर म्हणून फ़र्स्ट फ़्लाइट काम पाहत होती. दरम्यान Flipkart ला एका अशा माणसाची गरज होती की, जो त्यांचे इन-हाउस लॉजिस्टिक सांभाळू शकेल. अंबर यांना लॉजिस्टिक संबंधित सगळे कामे माहिती होती.

अंबरसाठी हे नशिब बदलण्यासारखे होते. फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन आणि बिन्नी बन्सल यांच्याशी अंबर यांची भेट झाली आणि त्यांनी अंबरला सांगितले की, आम्हाला थोडेसा इंग्रजी बोलू शकेल आणि संगणक चालवता येईल, अशा माणसाची गरज आहे. अशाप्रकारे अंबर हे फ्लिपकार्टमध्ये दरमहा 8000 रुपयांच्या पगारासह काम करू लागले.

अंबरला माहित होते की, ही कंपनी नुकतीच सुरू झाली आहे आणि आपण या कंपनीचा पहिले कर्मचारी आहोत.

फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन आणि बिन्नी बन्सल यांच्याशी अंबर यांनी अंबरला कामावर घेण्याबरोबरच कंपनीचे काही शेअर्सही दिले. फ्लिपकार्टचे काम जसजसे वाढत गेले तसतसे अंबरचे नशीबही खुलले.

आपले काम आणि परिश्रमाच्या जोरावर अंबर या कंपनीत असोसिएट डायरेक्टर म्हणून सध्या काम करत आहेट. सध्या ते महिन्याला 6 लाख रुपये कमावतात.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here