सर्जिकल स्ट्राईक न्यूज अपडेट : हिलाली यांनी 300 सैनिक मारल्याच्या मुद्द्यावर म्हटलेय की..

दि. 9 जानेवारी 2021 पासून देशभरात एक बातमी ट्रेंडमध्ये आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावरील ही बातमी आहे. ज्यात पाकिस्तानी राजनीतिज्ञ जफर हिलाली यांचा एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात त्यांनी बालाकोट हल्ल्यात 300 पाकिस्तानी सैनिक मारल्याचे कबूल केल्याचा दावा आहे. मात्र, हा व्हिडिओ काटछाट केलेला असून हिलाली यांनीच यावर ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे.

Maverick Bharat on Twitter: “Former Pak Diplomat Zafar admitted On Tv that in Balakot airstrike 300+ Terr0rists kiIIed and response of Pakistan was weak. https://t.co/EKYGGuC9dS” / Twitter

भारतातील  ANI, रिपब्लिक, द टाइम्स ऑफ़ इंडिया, मनी कंट्रोल, WION, हिंदुस्तान टाइम्स, नॉर्थईस्ट नाउ, ओडिशा टीवी,जागरण, स्वराज्य, लोकमत, वन इंडिया, डेक्कन हेरल्ड, बिज़नेस टुडे, लाइव मिंट, DNA, द क्विंट, न्यूज़18 इंडिया, HW न्यूज़, इंडिया टुडे, CNBC TV18, ABP न्यूज़, NDTV, इंडिया टीवी, झी न्यूज़, दैनिक भास्कर, फ्री प्रेस जर्नल आणि पत्रकार दीपक चौरसिया यांनी याच्या बातम्या करून ट्विटरवर शेअर केलेल्या आहेत. मात्र, बनावट व्हिडिओच्या माध्यमातून हा खोडसाळ प्रकार केल्याचे स्पष्ट होत आहे.

Zafar Hilaly on Twitter: “The extraordinarily extent to which the Indian Govt has gone to cut, splice and edit the tape of my Hum TV appearance suggests their desperation to prove what they failed to do, namely, lend credence to Modi’s lies about Balacot and his farcical claims.” / Twitter

alt news यांनी यावर स्पेशल रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी मूळ व्हिडीओ, त्यातील कट केला भाग आणि त्यातही बदल केलेला व्हिडिओ असे सगळे दाखले दिलेले आहेत. यातील मूळ व्हिडिओमध्ये जफर हिलाली यांनी म्हटलेले आहे की, सर्जिकल स्ट्राईक हल्ल्यात किमान 300 सैनिक मारण्याचा भारतीय सैन्याचा हेतू होता. मात्र, त्याचा तो हेतू सफल झाला नाही.

Zafar Hilaly on Twitter: “The Times Of India has an item based on the cut, spliced and edited tape of my Hum TV talk. Lacking first hand proof re Balacot, Modi is desperate for 3rd party confirmation for his lies and, not finding any, is doing a terrible job making it up.” / Twitter

मात्र, बनावट व्हिडिओमध्ये ‘मारना’ यामधून ‘ना’ हा शब्द हटवून ‘मारना’च्या ऐवजी ‘मारा’ केलेले आहे. एकूणच भारतीय सैन्याने पाकिस्तानला वेळोवेळी धडा शिकवला आहे. जिगरबाज भारतीय सैन्य पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश नावाचा देश स्थापन करण्यात यशस्वी झालेले शूरवीर सैन्य आहे. मात्र, तरीही देशातील इतर मुद्द्याकडील लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि अनेक माध्यम समूह अशा बनावट गोष्टी का पेरतात व फेक न्यूज का देत आहेत, याकडेच alt news यांनी लक्ष वेधेलेले आहे.

(188) Program Agenda Pakistan with Amir Zia | 23 Dec 2020 | Hum News – YouTube

9 जानेवारी रोजी भारतीय माध्यमांनी वृत्त दिले की पाकिस्तानी मुत्सद्दी हिलालीने कबूल केले आहे की 26 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या बालाकोट हवाई हल्ल्यात पाकिस्तानात 300 मृत्यू झाले होते. हा व्हिडिओ बनावट आहे. उलट तत्कालीन संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, मृत किंवा जखमींची संख्या जाहीर केली जाणार नाही. यानंतर आंतरराष्ट्रीय हल्ल्यात या हल्ल्यात कोणीही ठार झाले नसल्याची माहिती पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय माध्यमांना दिली होती. त्याच्या बातम्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत. अशावेळी यात फेक न्यूज का पेरल्या जात आहेत हाच मुद्दा या घटनेला आणखी संशयास्पद ठरवीत असल्याचे दिसते.

संपादन : सचिन मोहन चोभे

alt news यांनी प्रसिद्ध केलेला रिपोर्ट आणि त्याचे मुद्देसूद दाखले वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :

भारतीय मीडिया की ग़लत रिपोर्टिंग : पाकिस्तानी डिप्लोमैट ने बालाकोट में 300 की मौत की बात नहीं कही – Alt News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here