देशाच्या इतिहासात दुसर्‍यांदा घडणार ‘असे’; 26 जानेवारीबाबत केंद्र सरकारने दिली ‘ती’ महत्वाची माहिती

दिल्ली :

26 जानेवारी रोजी राजपथ येथे होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभास कोणतेही परदेशी मान्यवर उपस्थित राहणार नाहीत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे. 55 वर्षात प्रथमच असे होणार आहे. जेव्हा भारताच्या प्रजासत्ताक दिन उत्सवामध्ये इतर कोणताही देशाचे व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित नसतील. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, जगभरात पसरलेल्या कोविड 19 साथीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभामध्ये कोणत्याही परदेशी पाहुण्यास भाग न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन प्रजासत्ताक दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. पण ब्रिटनमधील कोविडचा नवा प्रकार आणि त्यातून निर्माण होणारी परिस्थिती पाहून ब्रिटीश पंतप्रधानांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला.

यापूर्वी परदेशी मुख्य पाहुण्याशिवाय भारतातील शेवटचा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम 1966 मध्ये पार पडला. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे 11 जानेवारी रोजी निधन झाले होते आणि इंदिरा गांधी यांनी 24 जानेवारी रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here