पहिल्यांदाच देशात पेट्रोलने मारली एवढी उसळी; ‘एवढ्या’ दिवसात पेट्रोलमध्ये 15 रुपयाची वाढ

मुंबई :

वाढत्या महागाईमुळे तुमच्या खिशावरील भार वाढलेला असताना अजून एक मोठी बातमी आली आहे. तुमच्या खिशावर अजून भार घेण्यासाठी तयार राहा कारण आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. परिणामी बहुतांश शहरांमध्ये दराच्या आकड्यानं नव्वदी ओलांडली आहे.

14 जानेवारीला तेल कंपन्यांनी 25 पैसे प्रतिलिटर दराने वाढ केली आहे. या वाढीसह दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर 84.70 रुपये तर डिझेल 74.88 रुपये प्रतिलिटर झाले आहे. दिल्लीतील किंमतींची ही विक्रमी पातळी आहे. महाराष्ट्रात तर पेट्रोल जवळपास 95 रुपयांना टेकले आहे. परभणी येथे देशातील सर्वात जास्त दराने पेट्रोल विकले जात आहे.

कालही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रतिलिटर 30 पैशांची वाढ केली होती. कालच्या वाढीनंतर महाराष्ट्रातील परभणीतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 93.45 रुपये आणि डिझेलची किंमत 82.40 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचली आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल ९१ रुपये लिटरच्या पुढे गेले आहे.

असे आहेत देशातील भाव :-

दिल्ली : पेट्रोल – 84.70  रुपये, डीजल – 74.88  रुपये

मुंबई :  पेट्रोल – 91.32 रुपये, डीजल – 81.60 रुपये

कोलकाता :  पेट्रोल – 86.15 रुपये, डीजल – 80.19 रुपये

चेन्नई :  पेट्रोल – 87.40  रुपये, डीजल – 79.95  रुपये

पटना : पेट्रोल – 87.23 रुपये, डीजल – 80.02 रुपये

बंगलुरु : पेट्रोल – 87.56  रुपये, डीजल – 79.40 रुपये

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here