कार.. सेन्सेक्स.. बीटकॉइन.. ग्रोथ.. पिक्चर अभी बाकी है..; पहा राजन यांनी असे का म्हटलेय

जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था रसातळाला जाण्याची भीती आहे. त्याचवेळी शेअर बाजार आणि बीटकॉइन यांची जोरात ग्रोथ होत आहे. हे परस्परविरोधी चित्र असून पुढील काळात अर्थव्यवस्था आणखी नकारात्मक ग्रोथ दाखवू शकते असे रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर आणि जगप्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. रघुराम राजन यांना वाटत आहे.

देशातील श्रीमंत लोकांकडून कारची मागणी वाढत आहे. पण त्याचवेळी दुचाकींची विक्री वाढत नाही. याकडे लक्ष वेधताना रघुराम राजन यांनी ईटी नाऊच्या मुलाखतीत आर्थिक संकट हटले नसल्याचे पुन्हा एकदा सूचित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मागील वर्षाच्या सुरूवातीस बिटकॉइनने 10,000 डॉलर ते 40,000 डॉलर्स गाठले. मात्र, तो फ़क़्त एक संपूर्ण बुडबुडा आहे.

शेअर बाजारातील ग्रोथवर प्रश्न विचारल्यावर बिटकॉइनचे उदाहरण देऊन राजन यांनी एकूण आर्थिक स्थिती आणि मार्केट यांच्यातील परस्परविरोधी मुद्दे अधोरेखित केले आहेत.

त्यांनी म्हटले आहे की, भारतात कारची विक्री वाढत आहे, परंतु दुचाकींची विक्री वाढत नाही. यामागचे कारण हे आहे की हे दोघेही वेगवेगळ्या वर्गाच्या गरजा भागवतात. उच्च मध्यम वर्ग कार खरेदी करीत आहे, तर निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब लोक दुचाकी खरेदी करतात. श्रीमंत लोक आपल्या संपत्तीमुळे आनंदी असतात. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांची परिस्थिती चांगली नाही. मागणी कोठून येत आहे हे पाहणे फार महत्वाचे आहे. एका अंदाजानुसार भारतात १८ दशलक्ष लोक बेरोजगार झालेले आहेत.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here