बाब्बो.. पासवर्ड विसरल्याने आली १७०० कोटी गमावण्याची वेळ; पहा नेमका काय प्रकार घडलाय

जगभरात सध्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था रसातळाला जात असतानाच शेअर बाजार आणि बिटकॉइन्स अर्थात आभासी चलन यांचे भाव गगनाला भिडत आहेत. मात्र, अनोखी सुरक्षाव्यवस्था असलेल्या बिटकॉइन्स या चलनाचा पासवर्ड विसरल्याने तब्बल १७०० कोटी रुपये जाण्याची शक्यता एका व्यक्तीच्या बाबतीत घडली आहे.

बिटकॉइन्सचे भाव वाढत असताना आता अनेकांना आपण कधीतरी घेऊन ठेवलेल्या या भासी चलनाची आठवण येत आहे. अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथील स्टीफन थाॅमस हेही त्यातलेच. त्यांनी तब्बल ७००२ इतके बिटकॉइन्स घेतले होते. आता त्यांची किंमत १७०० कोटी रुपये इतकी झालेली आहे.

मात्र, त्यांचा पासवर्ड लिहून ठेवलेला कागद हरवला आहे. त्यामुळे आता हे आभासी चलन पुन्हा कसे मिळवायचे हेच कोडे त्यांच्यापुढे आहे. बिटकॉइन्ससाठी १० वेळा पासवर्ड अटेम्प्ट करणे शक्य आहे. आतापर्यंत त्यांनी ८ अटेम्प्ट घालवले आहेत. अशावेळी आता पुढील २ अटेम्प्टमध्ये त्यांना पासवर्ड रिकव्हरी शक्य न झाल्यास त्यांना अब्जाधीश होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याचा झटका सहन करावा लागणार आहे.

जगात १.८५ कोटी बिटकॉइन असूनही सुमारे २०% (१० लाख कोटी रुपये) मालकांनी पासवर्ड विसरल्याने ते गमावले आहेत. एकूणच अनेकांना मोठे घबाड देणाऱ्या या चलनाने आता अनेकांची झोप उडवली असल्याचे यामुळे चित्र आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here