‘हे’ प्रसिद्ध पोलिस ऑफिसर शरद पवारांनंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; मुंडे प्रकरणावरून…

मुंबई :

चोहोबाजुने अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या डोकेदुखीत अजूनच भर पडली आहे. कारण  तुझ्या बहिणीला तक्रार परत घ्यायला लाव, नाहीतर तुझ्या परिवाराला खंडणीच्या गुन्ह्यात आतमध्ये टाकेन. तुम्हा लोकांना माझी पॉवर माहिती नाही अशी धमकी धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आल्याचा मोठा आरोप रेणूच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान मुंडे प्रकरणात आज मोठमोठ्या घडामोडी आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी धनंजय मुंडे प्रकरणी रोखठोक भूमिका घेतलीय. थोड्या वेळापूर्वीच आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवर जाऊन त्यांची भेट घेतलीय. त्यानंतर नांगरे पाटील आता सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.  

धनंजय मुंडेंवरच्या आरोपांनंतर थेट विश्वास नांगरे-पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात. विश्वास नांगरे-पाटील हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचीत आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीचं कोणतंही कठीण प्रकरण सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे विश्वास नांगरे या प्रकरणाची गुंतागुंत कशी सोडवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

तोपर्यंत मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी रेणु शर्मा हिच्याविरोधात माजी आमदार व सध्याचे भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे. ‘रेणू शर्मा ही ‘हनी ट्रॅप’ लावून प्रतिष्ठित व्यक्तींना ब्लॅकमेल करणारी महिला आहे,’ असं हेगडे यांनी तक्रारीत नमूद केलं आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here