ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या नावाखाली गावोगावी होणारे अर्थार्जन व आर्थिक घडामोडी आता लपून राहिलेल्या नाहीत. मात्र, यंदा निवडणूक आयोगाने अशा बिनविरोध अर्थपूर्ण निवडणुकांची दखल घेतानाच अशा निवडणुकाही रद्द केल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायतीची निवडणूक तब्बल दाेन कोटी पाच लाख रुपयांच्या लिलावामुळे गाजली होती. तिथे बातम्यांची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या चौकशीनंतर उमराणेची ही वादग्रस्त निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तर, नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी येथील सरपंचपदाची मंदिर बांधकामाची लिलावी निवड प्रक्रियाही रद्द झालेली आहे. कुलदैवत वाघेश्वरी मातेच्या मंदिरासाठी बोली लावून सरपंच या पदावर प्रदीप पाटील यांची ग्रामसभेत निवड झाल्याचा दावा खोटा असल्याचे आढळून आल्याने आयोगाने या निवडणुकीला आणि पैशांवरील निवडीला ब्रेक लावला आहे.
खोंडामळी येथील लिलावाप्रकरणी नंदुरबार पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यावर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहेत. तर, चांदवडचे उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांची भेट घेऊन आयोगाने चौकशीअंती ही चर्चेतील कोट्यावधींची पद विकण्याची निवडणूक रद्द केली आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस