म्हणून टाटा ग्रुप बनला देशातील सर्वात मौल्यवान बिझनेस ग्रुप; वाचा, काय आहे कारण

टाटा ग्रुप पुन्हा एकदा देशातील सर्वात मूल्यवान बिझनेस ग्रुप बनला आहे. टाटा समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. टाटा समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने वाढले असून या समूहाच्या लिस्तेड कंपन्यांचे बाजार भांडवल 17 लाख कोटींच्या पुढे गेले आहे.

एचडीएफसी ग्रुपच्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 15.25 लाख कोटी रुपये आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, टाटा समूहाच्या कंपन्यांनी संसाधनांचा अधिक चांगला उपयोग केला आहे. याचा परिणाम टाटा समुहाच्या कंपन्यांवर झाला आहे.

गेल्या एका महिन्यात टाटा समूहाचे मूल्य 1.9 लाख कोटी रुपयांनी (13 %) वाढले आहे, तर गेल्या एका वर्षात त्यात 3. 33 लाख कोटी (42%) वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात सेन्सेक्समध्ये 19 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे रिसर्च हेड पंकज पांडे यांनी सांगितले की, टाटा समूहाच्या शेअर्समधील वाढीमुळे बाजाराला उत्साह मिळाला आहे. भांडवल वाटपाच्या संदर्भात कंपनीने योग्य निर्णय घेतला आहे. ग्रुपच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक बदल झाले आहेत, जे आता निकाल दाखवत आहेत.

फेब्रुवारी 2017 मध्ये एन चंद्रशेखरन यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. भांडवल वाटप हे त्यांचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले होते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here