अरे..रे.. भारतात सरकारी लसखरेदीही जास्तीच्याच भावात; पहा तज्ञांचे नेमके काय म्हणणे आहे करोना लसबाबत

आता देशात करोना लस देण्याचा मोठा इव्हेंट सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर कोणाला मोफत व कोणाला विकत लस मिळणार हेच गुलदस्त्यातच असताना आता आणखी एक नवीन वांदा समोर येत आहे. त्यालाही चर्चेची हवा मिळण्यास सुरुवात झाली आहे. तो मुद्दा आहे सरकारी लस खरेदी करतानाची रक्कम व त्याचा भाव याचा.

दि. 16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. त्यासाठी लस तयार होऊन कोरोना लसीकरणासाठी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या केंद्रांवर पोहोचली जात आहे. या सर्व प्रकारात तज्ञ व काही संशोधक कोरोना लसीच्या किंमतीबद्दल प्रश्न उपस्थित करीत आहेत. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने सार्वजनिक आरोग्य कार्यकर्ते आणि उद्योग तज्ञांशी या विषयावर चर्चा केली. तज्ञांचे म्हणणे आहे की सरकार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) आणि भारत बायोटेकच्या लससाठी जास्त पैसे देत आहे. त्यातही भारत बायोटेक यांच्या लसच्या ट्रायल 3 फेजचा डाटाही नाही. तरीही ही लस खरेदी करून नागरिकांना देण्यात येणार असल्याकडे बातमीत लक्ष वेढलेले आहे.

ओपन मार्केटमध्ये कोरोना लसची किंमत 1000 रुपये असेल याबद्दलही प्रश्न आहेत. सरकार सीरम संस्थेच्या वतीने उत्पादित कोविशील्ड लससाठी दरडोई 200 रुपये देत आहे. तर, युरोपियन युनियन ऑक्सफोर्ड / अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसकडून त्याच लससाठी सुमारे 159  रुपये खरेदी भाव देत आहे. बेल्जियमच्या अर्थसंकल्पाच्या राज्य सचिवांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या दस्तऐवजावरून ही माहिती समोर आली आहे.

ऑल इंडिया ड्रग अॅक्शन नेटवर्क या सामाजिक संस्थेशी संबंधित एस श्रीनिवासन म्हणतात की, लसच्या दराबाबत सरकार अधिक वाटाघाटी करू शकले असते. तसेच सरकारकडून सर्वांसाठी मोफत लस देण्यात यावी. लसची किंमत सुमारे 100 रुपये असावी.

सार्वजनिक आरोग्यासाठी आग्रही वकील लीना मेनधने यांनीही म्हटले आहे की, उत्पादन खर्च, परवाना आणि इतर बाबींबाबत सरकार कंपन्यांकडून अधिक पारदर्शकतेची मागणी करू शकते. यामध्ये शासनासाठी नफा मार्जिन चार ते पाच पट जास्त नसावे.

यासंदर्भात सीरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला म्हणतात की, जगभरात कोणीही 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत लस देत नाही. आम्ही त्यासाठी योग्य किंमत घेतली आहे. उलट 2000 रुपये इतकी किंमत लससाठी यामुळे नागरिकांना द्यावे लागणार नाहीत. कोवॅक्स अलायन्स अंतर्गत कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी सीरमने लस किंमतीची जास्तीत जास्त 3 डॉलर किंमत निश्चित केली आहे. यापूर्वी 12 जून रोजी सरकारने म्हटले होते की भारतात तयार केलेल्या दोन्ही लस लोकांना स्वस्त दरात उपलब्ध होतील.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here