आता अमेझॉन उतरली ‘या’ नव्या बिझनेसमध्ये; भारतात सुरू केला ‘हा’ नवा आणि भन्नाट प्लेटफॉर्म

मुंबई :

अ‍ॅमेझॉन इंडियाने बुधवारी अ‍ॅमेझॉन अकॅडमीच्या लॉन्चिंगची घोषणा केली आहे. आता अ‍ॅमेझॉन कोचिंगच्या या नव्या बिझनेसमध्येही उतरले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अ‍ॅमेझॉनने बारावी पास असलेल्या आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नवा आणि भन्नाट प्लेटफॉर्म आणला आहे.

जेईईची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना यामुळे मदत होईल. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की यात विद्यार्थ्यांना जेईईसाठी ऑनलाइन आवश्यक असणारी सर्व तयारी केली जाईल. यात गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील विशेष शिक्षण सामग्री, थेट व्याख्याने आणि तपशीलवार मूल्यांकन केले जाईल. अ‍ॅमेझॉन अ‍ॅकॅडमीची बीटा आवृत्ती वेबवर आणि गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध असेल.

अमेझॉन अ‍ॅकॅडमी विद्यार्थ्यांना जेईईची तयारी करण्यासाठी अनेक गोष्टी पुरवेल. ज्यात शिक्षण तज्ज्ञांनी खास तयार केलेल्या मॉक टेस्टसह, निवडलेल्या 15 हजारहून अधिक प्रश्नांचा समावेश आहे ज्यात सराव करण्यासाठी प्रॅक्टीस आणि प्रश, उत्तरे असतील.

सर्व शिक्षण साहित्य आणि परीक्षेची सामग्री देशभरातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी विकसित केली आहे. जेईईबरोबरच, बिट्ससॅट, व्हीआयटीईई, एसआरएमजेईई आणि एमईटीची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना उपलब्ध सामग्रीचा देखील फायदा होईलह.

विशेष बाब म्हणजे सध्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्व फ्री आहे. येणारी काही वर्षे हे सर्व मोफत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मात्र किती वर्षांसाठी हे फ्री आहे, याबाबत काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here