मुंबई :
ड्रग्ज प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या समीर खान (Sameer Khan) याच्या घरावर एनसीबी (NCB)ने छापा टाकला आहे. समीर खान याच्या वांद्र्यातल्या घरी एनसीबीची टीम पोहोचली आहे, तिकडे सर्च ऑपरेशन सुरू आहे. करण सजनानी आणि समीर खान यांच्यात ड्रग्ज सप्लायबाबतचं चॅट आणि पैशांच्या देवाणघेवाणीचे पुरावे मिळाल्यानंतर एनसीबी ही छापेमारी करत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे. ‘कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. योग्य न्याय मिळेल. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे,’ असं नवाब मलिक म्हणाले.
समीर खान याला एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली. कोट्यधीश बिल्डर अशी ओळख असणाऱ्या करन सजनानी याला एनसीबीने बेड्या ठोकल्या.
कोण आहे समीर आणि का झाली अटक :-
समीर खान हे नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती आहेत. समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले होते. ड्रग्ज प्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस