बाजारात आले गायीच्या शेणापासून बनविलेले ‘खादी नैसर्गिक पेंट’; वाचा, काय आहे किंमत आणि 8 फायदे

दिल्ली :

देशाच्या बाजारपेठेत गायीच्या शेणापासून बनवलेले नैसर्गिक रंग(प्राकृतिक पेंट) आले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी खादी नॅचरल पेंट नावाच्या या नवीन अभिनव पेंटचे लोकार्पण केले. हे भारतातील गाईच्या शेणापासून बनवलेले पहिले रंग आहे. हे खादी व ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) विकसित केले आहे. या शेणाने बनविलेल्या पेंटच्या विशेष वैशिष्ट्यांमध्ये अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-फंगल समाविष्ट आहे. ते आर्थिकदृष्ट्या परवडनारे आणि गंधमुक्त असल्याचे सरकारने निवेदनात म्हटले आहे.

खादी नैसर्गिक पेंट दोन प्रकारे उपलब्ध आहे – डिस्टेंपर पेंट आणि इमल्शन पेंट.

डिस्टेम्पर पेंटची किंमत प्रति लीटर 120 रुपये आहे आणि इमल्शन पेंटची किंमत 225 रुपये प्रति लीटर आहे. मंत्री गडकरी म्हणाले की. मोठ्या पेंट कंपन्यांकडून आकारण्यात येणा किंमतींच्या तुलनेत या पेंटच्या किंमती अर्ध्याने कमी आहेत.

असे आहेत फायदे :-

हे पेंट अँटी बॅक्टेरिया, अँटी फंगल, इको फ्रेंडली आणि नैसर्गिक थर्मल इन्सुलेटर आहे. या पेंटचे वैशिष्ट्य म्हणजे किफायतशीर, गंधरहित, विना-विषारी आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here