आसाममधील हा एक किलो चहा विकला गेला तब्बल 50,000 ला; ‘या’ चहाची वैशिष्ट्ये वाचून व्हाल चकित

चहा म्हणजे भारतीयांचा प्राण आहे. अगदी झोपताना सुद्धा चहा पिणारे लोक फक्त भारतातच आढळतील. म्हणूनच भारतात, महाराष्ट्रात चहा हा brand म्हणून विकला जातो. चहा हे हळूहळू बाधा करणारे विष आहे, असेही म्हटले जाते. मात्र तरीही हौसेने महागडे चहा पिणारे लोक आपल्याला दिसून येतील. चहा पिण्यासाठी दुसर्‍या शहरात जाणारे अनेक चहालव्हर्सही आपल्याला दिसून येतील. आता आम्ही आपल्याला एक अशी घटना सांगणार आहोत, जी वाचून तुमचे डोळे खडकन उघडतील.

लोक बर्‍याचदा घरी चहा बनविण्यासाठी  बेस्ट क्वालिटी असणारा चहा आणतात. याची किंमत जास्तीत जास्त 500-1000 रुपये किलो असू शकते. पण आसाममधील एका व्यक्तीने एक किलो चहासाठी 50000 रुपये देऊ केले आहेत. या सौदयामुळे हा भारतातील सर्वात महागडा चहा बनला आहे.

मागच्या वर्षी जुलै महिन्यात गुवाहाटी चहा लिलाव केंद्रात (Guwahati Tea Auction Centre (GTAC)) मनोहर गोल्ड टीने हा विक्रम करून दाखवला आहे. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक लिलावात चहाला मिळालेली ही सर्वोच्च किंमत आहे.

मनोहरी टी इस्टेटने 5 वर्षांपूर्वी या चहाचे उत्पादन करण्यास सुरवात केली. या चहा इस्टेटचे मालक राजन लोहिया म्हणाले की, हा त्यांचा सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार चहा आहे. हा निवडक चहाच्या पानांपासून बनविला जातो.

मागील वर्षी हा चहा 39,001 रुपये प्रति किलोला लिलाव विकला गेला होता. या चहाने दुसरा क्रमांक मिळविला होता. पहिला नंबर अरुणाचल प्रदेशातील डोनी पोलो टी इस्टेटमधील गोल्डन सुई नावाच्या चाहणे मारला होता. जो प्रति किलो 40,000 रुपयांना विकला जात होता.

मनोहरी गोल्ड टी उत्कृष्ट गुणवत्तेच्या P-126 या चहाच्या पानांपासून तयार केला जातो. ही पाने मे आणि जूनमध्ये सकाळी सकाळी निवडून घेतली जातात. हा हंगाम त्याच्या उत्पादनासाठी अनुकूल नव्हता. त्यामुळे यावेळी केवळ 5 किलो गोल्ड चहाचे उत्पादन झाले आहे, अशी माहिती मनोहरी टी इस्टेटचे मालक राजन लोहिया यांनी दिली.

असो, चहाप्रेमींचा देश असणार्‍या भारतासाठी ही फार मोठी गोष्ट नाही. पण 50,000 या रकमेमध्ये आपण पुढची अनेक वर्षे चहा पिऊ शकतो./rare-assam-tea-was-sold-at-rs-50000-per-kg-at-auction

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here