नाव सुल्तान, नखरे नवाबी, नाश्त्यात लागते देशी तूप, संध्याकाळी पितो दारू; ‘त्या’ एका गोष्टीमुळे ‘या’ रेड्याची किंमत आहे 21 कोटी

घरी, क्लबमध्ये, पार्टीमध्ये अनेक लोकांना आपण व्हिस्की पिताना बघितले असेल, मात्र तुम्ही एखाद्या रेड्याला कधी व्हिस्कीचा आनंद घेताना पाहिले आहे का? हरियाणामध्ये असाच एक रेडा आहे, ज्याचा डोळ्यात भरणारा रुतबा हा कोणत्याही नवाबापेक्षा कमी नाही.

हरियाणाचा हा सर्वात महागड्या रेडा म्हणून ओळखला जातो. या रेड्याचे नाव सुल्तान असून त्याची आजची किंमत तब्बल २१ कोटी रुपये आहे. दिवसा देशी तूप घेणारा हा सुल्तान संध्याकाळी मात्र व्हिस्की पितो. जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र आम्ही हे खरे सांगत आहोत. 6 फूट उंची आणि १ टन वजनाचा या सुलतानने आतापर्यंत अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. शिवाय त्याचा मालक दरवर्षी त्याचे स्पर्म विकून जवळपास 1 कोटी रुपये मिळवितो.

या रेडयाचे नशिब तर पहा की, त्याला दररोज वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सची दारू, स्कॉच दिली जाते. तर मंगळवारी सुलतानला ड्राय-डे असतो, म्हणजे या दिवशी तो दारू पित नाही. राम नरेश बेनीवाल यांनी रोहतकमधून सुलतानला 2 लाख 40 हजार रुपयांत खरेदी केले होते. काही काळापूर्वी एका परदेशीयने त्याची किंमत 21 कोटी रुपये ठेवली होती. सकाळच्या नाश्त्यात सुलतान देशी तूप आणि दूध पिणार्‍या सुल्तानची अजूनही विक्री करण्यास त्याचा मालक तयार नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here